शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मोहरमनिमित्त रूबाबात सजले नवसाचे वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 11:05 IST

गळ्यात फुलांच्या माळा़ डोक्यावर मोर पिसारा़... दंडाला हिरवा पंचा आणि वाद्यांचा गजर असा रूबाब अन् मर्दानी थाटात शनिवारी (दि़७) मोहरमच्या सातव्या  दिवशी शहरातील कोठला,  दाळमंडई परिसरात नवसाचे वाघ सजले़ 

अहमदनगर: गळ्यात फुलांच्या माळा़ डोक्यावर मोर पिसारा़... दंडाला हिरवा पंचा आणि वाद्यांचा गजर असा रूबाब अन् मर्दानी थाटात शनिवारी (दि़७) मोहरमच्या सातव्या  दिवशी शहरातील कोठला,  दाळमंडई परिसरात नवसाचे वाघ सजले़  मोहरमनिमित्त नवासाचे वाघ सजविण्याची जुनी परंपरा आहे़ शनिवारी अगदी १ वर्षे वय असलेल्या मुलापासून ते २० वर्षांचे तरूणही नवसाचे वाघ बनून धार्मिक परंपरेत सहभागी झाले होते़ मोठे इमाम हसन आणि छोटे इमाम हुसेन यांची ताबूत सवारी नवसाला पावते अशी लोकश्रद्धा आहे़ त्यामुळे सर्वधर्मीय भाविक येथे नवस (मन्नत) बोलतात़ माझ्या मुलाला कुठलाही आजार होऊ नये, तो वाघासारखा चपळ आणि तंदुरूस्त रहावा असे मागणे मागून मुलाला वाघासारखे तयार करून वाजतगाजत सवारींच्या दर्शनासाठी नेले जाते़ मोहरमच्या सातव्या, आठव्या आणि नवव्या असे तीन दिवस नवसाचे वाघ सवारींच्या दर्शनासाठी नेले जातात़ मुलींसाठी केलेला नवस फेडण्यासाठी त्यांच्या डोक्यावर फुले ठेवून सवारींच्या दर्शनासाठी नेले जाते़ मोहरमनिमित्त नवसाचे वाघ सजविणारे रंगारी, वादक, कापड विक्रेते, फुले व प्रसाद विकणा-या व्यावसायिकांसह छोट्या मोठ्या वस्तू विकणा-यांनाही दहा दिवस चांगला रोजगार उपलब्ध होतो़ 

टॅग्स :Muslimमुस्लीम