शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

शेतकऱ्यांची चाड्यावर मूठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2016 01:25 IST

अहमदनगर : आर्द्रा नक्षत्रातील दमदार पावसाच्या जोरावर जिल्ह्याच्या बहुतांशी भागातील शेतकरी सुखावला आहे. खरिपासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली

अहमदनगर : आर्द्रा नक्षत्रातील दमदार पावसाच्या जोरावर जिल्ह्याच्या बहुतांशी भागातील शेतकरी सुखावला आहे. खरिपासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून वाफसा झालेल्या ठिकाणी पेरण्या सुरू झाल्या आहेत. गुरूवारपासून कृषी विभागाने खरीप हंगामातील पेरणीची आकडेवारी संकलित करण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात नगर, कर्जत, जामखेड, पाथर्डी या ठिकाणी २५ हजार २९० हेक्टवर कडधान्यांची आणि ३ हजार ३६६ हेक्टवर तेलबिया पिकाची पेरणी झालेली आहे. पेरणीची टक्केवारी ७ टक्के आहे.यंदा सुरूवातीच्या टप्प्यात पावसाने ताण दिल्याने शेतकरी, बियाणे, खते आणि किटक नाशक विक्रेते अडचणीत आले होते. नगरच्या बाजारपेठेत साधारण २०० कोटी रुपयांचे बियाणे पडून होते. सर्वांच्या नजरा आकाशाकडे होत्या. मात्र, चार दिवसांपासून नगरशहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पेरण्याची लगबग सुरू झाली आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ऊस पिकासह ५ लाख ९९ हजार हेक्टर क्षेत्र असून यात ऊस पिकाशिवाय २९ हजार ६५३ हेक्टरवर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. काही तालुक्यात पेरणीसाठी अद्याप वाफसा न झाल्याने त्या ठिकाणी पुढील आठवड्यात पेरण्याला सुरूवात होणार आहे. अकोले तालुक्यात अद्याप दमदार पाऊस नसल्याने भाताच्या लागवडी खोळंबल्या आहेत. (प्रतिनिधी)नगर तालुक्यात १ हजार ३२, कर्जत १२ हजार ४६६, जामखेड ८ हजार ७०९, पाथर्डी २ हजार १५६, श्रीगोंदा ९२७ हेक्टरवर पेरणया झालेल्या आहेत. १२ हजार १०९ हेक्टरवर तृणधान्य पीक असून याची पेरणी खरिपाच्या पेरणीत गृहीत धरण्यात येत नाही. जिल्ह्यात अवघ्या ११ हजार ७८७ हेक्टरवर उसाचे क्षेत्र आहे. हा सर्व खोडवा ऊस आहे. पीकनिहाय झालेली पेरणी (हेक्टर) बाजरी ७ हजार १३६, मका ४ हजार ९७३, तूर १ हजार ९१७, मूग ३ हजार ३०९, उडीद ७ हजार ८८१, भूईमूग ४, सुर्यफूल ३२०, यासह चारा पिके ३ हजार ३६६, कांदा पिक १५, भाजीपाला पिके ११० यांचा समावेश आहे.