या कार्यालयाने केलेल्या चौकशीत जो नकाशा कानवडे यांनी पडताळणीसाठी पाठविला तो बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा नकाशा कानवडे यांना नगरपंचायतकडून मिळालेला आहे. याचा अर्थ संबंधितांनी बांधकाम परवानगीसाठी बनावट नकाशा सादर केला.
यासंदर्भात भूमी अभिलेख विभागाने नगरपंचायतलाही अहवाल कळविला आहे. बनावट नकाशा तयार करणे, त्यासाठी बनावट सही, शिक्के बनिवणे, कर्मचारी व अधिकारी यांच्या हुबेहूब सह्या करणे ही बाब फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असल्याचे नमूद करत कानवडे यांचा तक्रार अर्ज पुढील कार्यवाहीसाठी भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक डी. डी. सोनवणे यांनी अकोले पोलिसांकडे पाठविला आहे. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कार्यवाही केलेली नाही. यासंदर्भात नगरपंचायतनेही काहीच कार्यवाही केलेली नाही.
.........
पोलिसांकडून कारवाई नाही
भूमी अभिलेख विभागाने गत १७ मार्च रोजी या बनावट कागदपत्रांचा अहवाल व गणेश कानवडे यांचा तक्रार अर्ज अकोले पोलिसांना पाठविला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नसल्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी सांगितले. आमच्याकडे कुणाचीही तक्रार नसल्याचे कारण त्यांनी दिले. भूमी अभिलेखने लेखी पत्र दिले असतानाही पोलिसांनी कुणाचीही तक्रार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
.......
पोलिसांची भूमिका संशयास्पद
अकोले पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमक्ष हाणामारी झाल्यानंतरही पोलिसांनी तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल केल्याचे प्रकरण नुकतेच उजेडात आले आहे. त्याप्रकरणी पोलीस अधीक्षक यांनी खुलासा मागवला आहे. बनावट नकाशाप्रकरणीही भूमी अभिलेखचा अहवाल असतानाही पोलिसांनी कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे अकोले पोलिसांच्या भूमिकेविषयी शंका निर्माण होत आहे.