शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेळकेच्या अटकेचा मार्ग मोकळा : शहर बँकेतील संशयास्पद कर्जप्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 19:20 IST

: शहर सहकारी बँकेतील बोगस कर्ज अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ़ निलेश शेळके याचा तीनही गुन्ह्यातील अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळला़ अर्ज फेटाळल्याने शेळके याला अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे़

अहमदनगर : शहर सहकारी बँकेतील बोगस कर्ज अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ़ निलेश शेळके याचा तीनही गुन्ह्यातील अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळला़ अर्ज फेटाळल्याने शेळके याला अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे़जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्यासमोर या जामीन अर्जावर सुनावणी झाली़ सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड़ अर्जुन पवार तर फिर्यादीच्यावतीने अ‍ॅड़ किरण जंगले, अ‍ॅड़ आनंद शिंदे व अ‍ॅड़ भीमराज काकळे यांनी युक्तिवाद केला़ पवार यांनी न्यायालयात सांगितले की, डॉ़ निलेश शेळके याने तीनही फिर्यादींच्या नावे शहर सहकारी बँकेतून हॉस्पिटलमध्ये मशिनरी खरेदीसाठी कर्ज मंजूर करून घेतले़ बँकेने या कर्जाचे धनादेश डिलरच्या नावे दिले़ डिलरने हे धनादेश फिर्यादीच्या केडगाव येथील अर्बन बँकेच्या खात्यात जमा केले आणि ती रक्कम काढून अपहार केला. फिर्यादीच्या नावे केडगाव येथील बँकेतील खातेच बनावट असल्याचा फिर्यादी यांचा आरोप आहे़ त्यामुळे खाते उघडताना केलेल्या स्वाक्षरी, हस्ताक्षरांचे नमुने घेणे, रकमेबाबत सखोल तपास करून त्याची वसुली करणे यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची गरज आहे़ फिर्यादीचे वकील अ‍ॅड़ जंगले यांनी युक्तिवाद केला की, शहर बँकेतील बोगस कर्जप्रकरण म्हणजे जनतेच्या पैशांचा अपहार असून हा गंभीर गुन्हाच आहे़ कर्जप्रकरणातील सर्व पैसे हे डॉ़ शेळके यानेच काढून घेतल्याचे दिसत आहे़ घेतलेल्या पैशांचा कुठे वापर केला हे समोर आलेले नाही़ कर्जप्रकरणातील कागदपत्रांवर शेळके याने फिर्यादीच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या आहेत़ यातून आरोपीचा पैशांचा अपहार करण्याचा उद्देश समोर येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फिर्यादी व सरकारी पक्षाच्यावतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला़काय आहे प्रकरण४निलेश शेळके याने येथील शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे राहुरी येथील डॉ. रोहिणी भास्कर सिनारे, येथील डॉ. उज्ज्वला रवींद्र कवडे व डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे यांच्या नावे ५ कोटी ७५ लाख रूपयांचे कर्ज मंजूर करून घेत फसवणूक केली़ याप्रकरणी वरील तीनही डॉक्टरांनी दिलेल्या स्वतंत्र फिर्यादीवरून शेळके याच्यासह बँकेचे संचालक व मशिनरीचे डिलर अशा २५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर