शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

सेवा खंडित केलेल्या कर्मचा-यांचे शेवगावात धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 17:04 IST

शेवगाव नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी सेवा खंडित देलेल्या ९६ कर्मचा-यांनी अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात बुधवारपासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार या कर्मचा-यांनी जाहीर केला.

शेवगाव : शेवगाव नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी सेवा खंडित देलेल्या ९६ कर्मचा-यांनी अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात बुधवारपासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार या कर्मचा-यांनी जाहीर केला.शेवगाव नगर परिषदेत एकूण २५३ कर्मचारी कार्यरत होते. यापैकी १५७ कर्मचा-यांना किमान वेतन दिले जाते. उर्वरित ९६ कर्मचा-यांना तुटपुंजा वेतनावर राबवून घेतले जात असल्याच्या कर्मचा-यांच्या तक्रारी आहेत. शेवगाव ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रुपांतर होण्याच्या घोषणेनंतर १ मार्च २०१४ नंतर सेवेत हे कर्मचारी आहेत. शेवगाव नगर परिषदेची आर्थिकस्थिती तसेच या कर्मचा-यांची तांत्रिक दृष्ट्या सक्षमता याबाबतची सबब पुढे केली जात असली तर त्यात तथ्य नसल्याचा या कर्मचा-यांचा आरोप आहे. या कर्मचा-यांमध्ये अनेकजण उच्च शिक्षित असूनअनेकांना संगणक व टंकलेखन अवगत आहे. गटविकास अधिका-यांनी ५७ कर्मचा-यांना प्रमाणित केले आहे. तसेच नगर परिषदेच्या २ आॅगस्ट २०१७ च्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र. ८ नुसार सर्व नगरसेवकांनी या कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याचा ठराव केला आहे. याशिवाय ६ महिन्यापूर्वी तत्कालीन मुख्याधिका-यांनी नगर विकास खात्याकडे या ९६ कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याविषयी लेखी आश्वासन दिलेहोते. मात्र गेल्या २१ तारखेला या कर्मचा-यांना त्यांच्या सेवा खंडित करण्यात आल्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. हा अन्याय असल्याचे या कर्मचा-यांचे म्हणणे आहे.दरम्यान, सोमवारी व मंगळवारी या ९६ कर्मचा-यांनी या निर्णयाच्या विरोधात तहसील कार्यालयाच्या समोर धरणेआंदोलन सुरु केले. त्यानंतर आज बुधवारपासून (दि. ३१) या कर्मचा-यांनी नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. शेवगाव नगर परिषदेचे काही नगर सेवक व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांनी आंदोलनकर्त्या कर्मचा-यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. या संदर्भात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कापडणीस यांच्याशी संपर्क झाला नसल्याने प्रशासनाची बाजू समजू शकली नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव