शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

३९६ मतदान यंत्रांमध्ये बिघाड : मतदान यंत्रे बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 13:44 IST

अहमदनगर लोकसभा मतदार संघात मंगळवारी मतदानास सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीस घेण्यात येणाऱ्या चाचणी मतदानादरम्यान (मॉक पोल) १८७ केंद्रांमध्ये मतदान यंत्रेच सुरू झाली नव्हती.

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदार संघात मंगळवारी मतदानास सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीस घेण्यात येणाऱ्या चाचणी मतदानादरम्यान (मॉक पोल) १८७ केंद्रांमध्ये मतदान यंत्रेच सुरू झाली नव्हती. त्यानंतरही मतदान सुरू असताना सकाळी अकरा वाजेपर्यंत अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडली होती. आतापर्यत ३९६ मतदान यंत्रे बदलण्यात आली.अचानक यंत्रे बंद पडल्याने निवडणूक यंत्रणेचा मोठा गोंधळ उडाला होता. खराब झालेली यंत्रे तातडीने बदलून देण्यात आली. अहमदनगर एम. आय.डी. सी. येथील गोदामातून ज्या ठिकाणच्या यंत्रांमध्ये दोष निर्माण झाले आहेत, तेथे पर्यायी यंत्रे पोहोचविली जात होती.मांडवा येथे मशिनमध्ये वारंवार बिघाड झाल्याने मतदारांना १ तासाहून अधिक काळ हाल सोसावे लागले. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत मतदारांनी रांगांमध्येच विश्रांती घेतली. नान्नज, मुंगेचीवाडी, खर्डा येथेही २ तासांपेक्षा जास्त वेळ मतदान यंत्रे पडली होती. त्यामुळे मतदार यंत्र सुरू होण्याची वाट पहात शाळेच्या पडवीत बसले होते. अहमदनगर शहरात अभिनेते मोहिनीराज गटणे यांनी मतदानाचा हक्क बजावला. आॅस्ट्रेलियात स्थायित झालेले विजय सप्रे यांनी श्रीगोंदा शहरातील केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. जामखेड शहरातील मतदान केंद्रात भर उन्हात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आजीबाई आपल्या नातवासोबत आल्या होत्या.शेवगाव शहराजवळील शोभानगर येथील मतदारांनी शीव रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता. मात्र महसूल अधिकाऱ्यांनी नागरिकांशी चर्चा केल्यानंतर मतदानावर घातलेला बहिष्कार मागे घेतल्यानंतर याठिकाणी मतदान सुरळीत सुरू झाले. राहुरी शहरातील मतदान केंद्रात दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतरही व्हिल चेअरवर व रँपची सुविधा उपलब्ध करून देण्यात न आल्याने ९५ वर्षीय सुंदरबाई सोनवणे या ज्येष्ठ महिलेस खरडत खरडतच मतदान यंत्रापर्यंत पोहोचावे लागले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019