शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

तणनाशकावर उतारा काक-या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 13:03 IST

वारंवार तणनाशकाचा वापर करून जमिनीचा पोत बिघडत असल्याची ओरड सर्वत्र सुरू आहे. मात्र सडे (ता. राहुरी) येथील शेतकरी गुलाब सरोदे हे गेल्या तीन वर्षापासून कपाशी या पिकामध्ये काक-या हाकून तणाचा बंदोबस्त करीत आहेत.

भाऊसाहेब येवलेराहुरी : वारंवार तणनाशकाचा वापर करून जमिनीचा पोत बिघडत असल्याची ओरड सर्वत्र सुरू आहे. मात्र सडे (ता. राहुरी) येथील शेतकरी गुलाब सरोदे हे गेल्या तीन वर्षापासून कपाशी या पिकामध्ये काक-या हाकून तणाचा बंदोबस्त करीत आहेत. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली आहे. ग़ुलाब सरोदे यांची चार एकर जमीन आहे. दरवर्षी कपाशी, ऊस, भुईमूग अशी पिके घेतात. कपाशी या पिकावर कमी खर्च करण्याकडे त्यांचा कल आहे. कपाशीची दीड बाय चार या अंतरावर लागवड करण्यात आली आहे. कपाशी पीक उगवल्यानंतर पावसाचे आगमन झाले. त्यामुळे कपाशीमध्ये गवत व वेल उगवण्यास सुरूवात झाली आहे. त्यावर उतारा म्हणून गुलाब सरोदे यांनी काक-या मारण्यास सुरूवात केली आहे.सरोदे यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष भेट दिली असता ‘लोकमत’शी संवाद साधतांना सांगितले की, दोन एकर क्षेत्रावर भक्ती या वाणाची लागवड करण्यात आली आहे. कपाशी उगवल्यानंतर गवताचा बंदोबस्त करण्यासाठी काक-या मारल्या. त्यामुळे गवताचा बंदोबस्त होऊन जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत झाली. कपाशी लावणीपासून ते कापूस वेचण्यापर्यंत पंचवीस हजार रूपये खर्च होतो. तण नियंत्रणासाठी खुरपणीवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यामुळे होणारा खर्च व उत्पन्न यामध्ये मेळ बसत नाही. त्यामुळे भाडोत्री बैलाच्या सहाय्याने काक-या मारल्या जातात. एकरी आठशे रुपये इतका अल्प खर्च काक-याला येतो. त्यामुळे कपाशी पिकाचे नुकसान न होता खर्च कमी होऊन जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत होते.कपाशी या पिकामध्ये यानंतर फरट मारण्यात येणार आहे. बाजरी पिकामध्येही आपण कोळपणीचा अवलंब करतो. मात्र भुईमूग पिकांमध्ये खुरपणी करून घेतो. उसाचे पीक गेल्यानंतर पाचरट न जाळता ते जमिनीत कुजविले जाते. त्यामुळे जमिनीला खत मिळून पोत सुधारण्यास मदत होते, असे गुलाब सरोदे यांनी सांगितले. राज्यभर शेतकरी बोंडअळीमुळे त्रस्त असताना स्प्रिंकलरचा कपाशी पिकामध्ये वापर करण्यात आला. त्यामुळे पीक धुऊन निघाले. स्पिंकलरव्दारे पाणी मिळाल्याने कोणताही रोग, कीड व मावा आढळून आला नाही. स्प्रिंकलरवर दोन एकरासाठी २७ हजार रूपये खर्च आला़ त्याचा वापर कांदा, भुईमूग या कमी वाढणा-या पिकासाठी होतो. सगळे रोग किडी धुऊन जातात. त्यामुळे मागील वर्षी एकही औषधाची फवारणी केली नाही़, असे गुलाब सरोदे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी