शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण काढण्याच्या खर्चावरून कोपरगाव पालिकेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 18:56 IST

कोपरगाव शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी होणा-या आर्थिक खर्चास मंजुरी देण्याच्या मुद्यावरून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक आक्रमक झाल्याने गुरूवारी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ झाला.

कोपरगाव : शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी होणा-या आर्थिक खर्चास मंजुरी देण्याच्या मुद्यावरून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक आक्रमक झाल्याने गुरूवारी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ झाला. हा विषय तहकूब केल्यावर वातावरण शांत झाले.नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची ५ तास सर्वसाधारण सभा चालली. उपनगराध्यक्ष विजय वाजे, मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, नगर अभियंता विजय पाटील, कार्यालयीन सहाय्यक विनोद पाटील, सोपान शिंदे आदी उपस्थित होते. सभा लिपिक बाळासाहेब जोशी यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. कार्यारंभ आदेशानंतरही मुदतीत कामे सुरू न करणा-या ठेकेदारांवर कारवाई करावी, अतिक्रमण खर्चास मंजुरी, गाळे भाडेवाढ, पालिकेच्या आर्थिक हितास बाधा आणणा-या विषयांना प्रशासनाची मान्यता घ्यावी, या मुद्यांवरून एकमेकांना टार्गेट करणा-या भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला.अतिक्रमण खर्चास जाधव यांनी कडाडून विरोध केला. वाजे यांनी माझे नगरसेवकपद गेले तरी चालेल, पण आधी विस्थापितांचे पुनर्वसन करा, मगच अतिक्रमण काढा, असे म्हणत विरोध दर्शविला. पाणी पुरवठा सभापती स्वप्निल निखाडे यांनी देखील दुजोरा दिला. वर्पे यांनी शहरातील इतर जागा शोधून १ हजार ४०० विस्थापितांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. दरेकर यांनी शहर विकास आराखड्यातील वाणिज्य जागांवरच खोका शॉप देता येतात, असे सांगितले. वहाडणे यांनी राजकारण न करता विस्थापितांसाठी खोका शॉप देण्यासाठी किरकोळ दुरूस्ती करून इतर जागांचा शोध घेण्याचे आश्वासन दिले. मंदार पहाडे व शिवाजी खांडेकर यांनी शौचालयांच्या स्वच्छतेसाठी पाणी देण्याची मागणी केली. आरोग्य सभापती अनिल आव्हाड यांनी मांडलेल्या भटक्या जनावरांच्या प्रश्नावर वहाडणे यांनी कारवाई करताना राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला. जाधव यांनी त्यांच्या प्रभागातील रस्त्याचे ४ महिन्यांर्पूाी भूमिपूजन होऊनही काम सुरू न झाल्याचे सांगत अधिका-यांना फैलावर घेतले. रवींद्र पाठक यांनी विकास कामात राजकारण नको, असे सांगत झोपडपट्टीत स्वच्छता होत नसल्याचे म्हटले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव