ग्रामीण भागातील तरुण पोलीस भरतीसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी कष्ट घेताना दिसतात. त्यांच्यासाठी गावातच व्यायाम शाळा सुरू होत असल्याने शरीर सुदृढ ठेवण्यासाठी मदत होईल. कोरोना महामारीमुळे व्यायामाचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात व्यायामाची गोडी निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे, असे आमदार कानडे यांनी सांगितले.
विशेष अनुदान योजनेंतर्गत या उपक्रमाला चालना देण्यात आली आहे. व्यायाम शाळेसाठी खोली अथवा जागा उपलब्ध असल्यास पाच लाख रुपये किमतीचे साहित्य जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडून प्रस्ताव तयार करून घेऊन मंजूर केले आहे. यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव, उंबरगाव, कान्हेगाव, टाकळीभान, कारेगाव, माळवाडगाव, निमगाव खैरी, भामाठाण, हरेगाव, मुठेवाडगाव, मांडवे, कडीत बुद्रुक, लाडगाव, माळेवाडी, भैरवनाथ नगर, फत्याबाद, एकलहरे, खानापूर, दिघी, ब्राह्मणगाव वेताळ, जाफराबाद तर राहुरीतील जातप, त्रिंबकपूर, खुडसरगाव या गावांचा समावेश आहे.
------