शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'समन्यायी' कायद्यातून ब्रिटिशकालीन धरणे वगळावी; श्रीरामपूर बाजार समितीच्या सभेत ठराव

By शिवाजी पवार | Updated: September 29, 2023 10:18 IST

शेतकरी संघटना, बाजार समितीची सर्वसाधारण सभा विठ्ठलराव विखे पाटील सभागृहात काल पार पडली

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : समन्यायी पाणी वाटप कायद्यातून ब्रिटिशकालीन धरणांना वगळण्यात यावे, या मागणीचा ठराव श्रीरामपूर बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. या कायद्यामुळे नगर व नाशिक विरुद्ध मराठवाडा असा पाणी संघर्ष पेटलेला आहे.

बाजार समितीची सर्वसाधारण सभा विठ्ठलराव विखे पाटील सभागृहात काल पार पडली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सभापती सुधीर नवले, उपसभापती अभिषेक खंडागळे, मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, बाबासाहेब दिघे, नानासाहेब पवार आदी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश ताके यांनी समन्यायी पाणी वाटप कायद्याचे नगर व नाशिक जिल्ह्याला दुष्परिणाम भोगावे लागत असल्याचा आरोप केला. समन्यायी कायद्यानुसार जायकवाडी धरणात पिण्यासाठी पर्याप्त साठा नसेल तर गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून पाणी सोडावे लागते.

ताके म्हणाले, समन्यायी पाणी वाटप कायदा हा ब्रिटिशकालीन भंडारदरा धरणाला लागू करू नये. हा कायदा संपूर्ण राज्यासाठी करण्यात आला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी केवळ गोदावरी खोऱ्यातच केली जात आहे. भीमा खोऱ्यात समन्यायी कायद्याची अंमलबजावणी गरज असूनही अद्यापपर्यंत झालेली नाही. त्यामुळे उजनीसाठी पाणी सोडले गेले नाही. समन्यायीचा कायदा केवळ नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गळा अवळण्यासाठी केलेला असावा, असे षडयंत्र वाटते.