शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

माजी पोलीस निरीक्षक ढोकले यांचा येरवडा कारागृहात मृत्यू

By admin | Updated: August 12, 2016 23:56 IST

पुणे/अहमदनगर :नितीन साठे याच्या पोलीस कोठडीतील मारहाणीत झालेल्या मृत्यूप्रकरणी अटकेत असलेल्या माजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांचा येरवडा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

पुणे/अहमदनगर : नगर जिल्ह्णातील नितीन साठे याच्या पोलीस कोठडीतील मारहाणीत झालेल्या मृत्यूप्रकरणी अटकेत असलेल्या माजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांचा येरवडा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्यावर येरवडा कारागृह रुग्णालयात उपचार सुरु होते. कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोकले मार्च महिन्यापासून येरवडा कारागृहात होते. नगर कारागृहामधून त्यांना येरवडा कारागृहात वर्ग करुन घेण्यात आले होते. दलित तरुण नितीन साठे याचा पोलीस कोठडीदरम्यान ढोकले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केल्यामुळे मृत्यू झाला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करुन ढोकले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. ढोकले यांनी नगर जिल्ह्णातील कर्जत, पारनेर आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम केले आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी असताना नितीन साठे याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता. ढोकले यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यावर ते पुन्हा कारागृहात परतले होते. शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली. येरवडा कारागृह रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. एस. देशपांडे यांनी तातडीने ढोकले यांना आॅक्सिजन पुरवण्याचा तसेच अन्य उपचार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे अधीक्षक यू. टी. पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)ढोकले यांचा मृत्यू संशयास्पद आहे. त्यांना योग्य उपचार दिले गेले नाहीत. एवढी वर्ष पोलीस दलासाठी काम केलेल्या व्यक्तीला गुन्हेगारासारखी वागणूक देण्यात येत होती. कोणाच्या तरी दबावाखातर त्यांना उपचार देण्यात आले नाहीत. त्यांनी अनेकदा विनंतीही केलेली होती. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.’’- नारायण कामठे, ढोकले यांचे व्याही