शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठसह दोघांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 15:53 IST

मारहाण व दमदाटीप्रकरणी पाथर्डी बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ यांच्यासह त्यांच्या दोन भांवाना जिल्हा न्यायालयाने १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे़ जिल्हा व सत्र न्यायाधीश वी़वी़ बांबर्डे यांनी हा निकाल दिला़

अहमदनगर : मारहाण व दमदाटीप्रकरणी पाथर्डी बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ यांच्यासह त्यांच्या दोन भांवाना जिल्हा न्यायालयाने १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे़ जिल्हा व सत्र न्यायाधीश वी़वी़ बांबर्डे यांनी हा निकाल दिला़पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथे शहा शरीफ बाबा यात्रेत ३ एप्रिल २०१४ रोजी रात्री सलीम रज्जाक शेख व गावातील अशोक शिरसाठ यांच्यात वाद झाला़ या वादातून ४ एप्रिल २०१४ रोजी शेख यांना शिरसाठ बंधुंनी मारहाण करण्यास सुरूवात केली़ यावेळी गावातील गोकूळ गाडे व भुजंगराव गाडे यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला़ यावेळी गहिनीनाथ शिरसाठ यांनी भुजंगराव गाडे यांना जिवे मारण्याची धमकी दिली़ या घटनेचा मनस्ताप सहन न झाल्याने भुजंगराव हे घटनास्थळी चक्कर येऊन पडले़ त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता़ याप्रकरणी गहिनीनाथ यांच्यासह अशोक जगन्नाथ शिरसाठ व राजेंद्र जगन्नाथ शिरसाठ यांच्याविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याबाबत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते़या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने सात साक्षीदार तपासण्यात आले़ आरोपींविरोधात कलम ३२३ व ५०६ अन्वये पुरावा समोर अल्याने न्यायालयाने तिघांना कलम ३२३ प्रमाणे ६ महिने शिक्षा व ५०० रूपये दंड तसेच कलम ५०६ प्रमाणे १ वर्षे शिक्षा व ५०० दंड अशी शिक्षा ठोठावली़ या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड़ पुष्पा गायके-कापसे यांनी काम पाहिले़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी