नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे, शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्यासह श्रीरामपूर व शिर्डी विभागाचे पोलीस अधिकारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, डॉ. दिलीप शिरसाठ, भरत मोरे, मौलाना रौफ, अहमद जहागीरदार यांनी सूचना मांडल्या. नगराध्यक्ष अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे व प्रांताधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
पाटील म्हणाले, गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासनासह सर्व शासकीय यंत्रणा सज्ज आहे. सार्वजनिक कार्यक्रम साजरे करण्यास हरकत नाही, परंतु योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांना आता कोरोनाचा विसर पडत आहे. मात्र सोशल डिस्टन्सिगसह सॅनिटायझर व मास्कचा नियमित वापर करावा. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी गणेशोत्सव मंडळांनी जनजागृती करून लोकांमधील गैरसमज दूर करावेत. कायदा सर्वांसाठी समान आहे. पोलीस जनतेला त्रास देण्यासाठी कारवाई करीत नाहीत. सामाजिक शांततेसाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाई करावी. लोकामध्ये सुधारणा होत असेल तर कारवाई करताना पोलिसांनी तारतम्य बाळगावे, अशा स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिल्या.