स्वच्छ व हायजीन अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी शहरात अनेक वर्षांपासून जनजागृती करणाऱ्या हायजीन फस्ट या संस्थेच्यावतीने शहरातील विविध भागात रस्त्यावर हातगाडींवर खाद्यविक्री करणाऱ्यांनी अन्नपदार्थ व परिसराच्या स्वच्छतेचे निकष पाळावे, यासाठी रोटरी क्लब सेन्ट्रल, आय लव्ह नगरच्या संयुक्त विद्यमाने ‘हायजीन हातगाडी पुरस्कार’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुटे बोलत होते.
या उपक्रमात शहरातील माळीवाडा, आनंदधाम चौक चौपाटी, प्रोफेसर कॉलनी चौकातील चौपाटी, दिल्लीगेट, पारिजात चौक येथील हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांची पाहणी करण्यात आली. या उपक्रमात स्वच्छतेचे सर्व निकष पाळणाऱ्या हातगाडीचालकांना अन्न औषध निरीक्षक प्रदीप कुटे यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.
यावेळी हायजीन फस्टच्या वैशाली गांधी, सदस्य अनुराधा रेखी, गायत्री रेणावीकर, वैशाली मुनोत, डॉ. रोहित गांधी, स्वाती गुंदेचा, रोटरी क्लब सेन्ट्रलचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले, सचिव ईश्वर बोरा, आय लव्ह नगरच्या विशाखा पितळे, आश्लेषा भांडारकर, निर्मला गांधी उपस्थित होते.
प्रास्ताविकात वैशाली गांधी म्हणाल्या, ‘नागरिकांनी बाहेरचे अन्न घेताना अन्नपदार्थ स्वच्छ व उत्तम दर्जाचे असावेत, बाहेरील जंतू विषाणूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी जागरूक असावे, हायजीन फस्ट संस्थेच्यावतीने राबवलेल्या या उपक्रमात शहरातील भरपूर हातगाडीचालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन स्वच्छतेचे निकष पूर्ण केले आहेत. त्यांना सन्मानपत्रे दिले आहेत. प्रास्ताविक अनुराधा रेखी यांनी केले. आभार ईश्वर बोरा यांनी मानले.