भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून संपूर्ण भारतभर १३ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत 'आझादी का अमृत महोत्सव' उत्साहात साजरा केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑगस्ट २०२१ रोजी 'रन फॉर फिट इंडिया' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. अध्यक्षांनी हिरवा झेंडा दाखवून दोन किलोमीटरच्या 'रन फॉर फिट इंडिया' रॅलीचे उद्घाटन केले. या रॅलीमध्ये एकूण ६० कॅडेट व स्वयंसेवक सहभागी झाले. कार्यक्रमासाठी कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, महाविद्यालयाचे प्रबंधक बबन साबळे, एनसीसी कॅप्टन प्राजक्ता भंडारी, लेफ्ट. भरत होळकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश निमसे, प्रा. डॉ. मच्छिंद्र मालुंजकर, प्रा. डॉ. सुनीता मोटे आणि प्रा. भगवान कुंभार आदी उपस्थित होते. लेफ्ट. भरत होळकर यांनी सूत्रसंचालन केले.
---------
फोटो - १४न्यू आर्टस काॅलेज
न्यू आर्टस महाविद्यालयात दोन किलोमीटरच्या 'रन फॉर फिट इंडिया' रॅलीला हिरवा झेंडा दाखवताना प्राचार्य डाॅ. बी. एच. झावरे, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, प्राजक्ता भंडारी, भरत होळकर, गणेश निमसे आदी.