शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

थंडीतही उबदार कपड्यांमध्येही आता तरुणाईची फॅशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:48 IST

थंडीने आता चांगलाच जोर धरला आहे. तापमान १२ ते १५ अंशावर असले तरी रात्रीची थंडी चांगलीच वाढली आहे. कानटोपी, मफलर, स्वेटर विक्रीची दुकानेही थाटली आहेत. उबदार कपड्यांमध्येही आता फॅशनचे कपडे असून त्याला तरुणांची चांगलीच पसंती आहे.

शुभम् तांगडे । अहमदनगर : थंडीने आता चांगलाच जोर धरला आहे. तापमान १२ ते १५ अंशावर असले तरी रात्रीची थंडी चांगलीच वाढली आहे. कानटोपी, मफलर, स्वेटर विक्रीची दुकानेही थाटली आहेत. उबदार कपड्यांमध्येही आता फॅशनचे कपडे असून त्याला तरुणांची चांगलीच पसंती आहे. थंडीपासून बचाव करायचा मात्र तोही फॅशनसह असेच सध्या रुढ झाले आहे.ऋतुप्रमाणे कपड्यांची फॅशनही बदलते. आपण इतरांपेक्षा अधिक वेगळे आणि आकर्षक कसे दिसू याकडे सर्वांचे लक्ष आहे. आधी काही ठराविक कपडे थंडीपासून बचावासाठी वापरले जायचे. परंतु आता काळासोबत फॅशनचे ट्रेंडही बदलत आहेत. त्यामुळे आता बाजारपेठाही वेगवेगळ्या प्रकारच्या हिवाळी कपड्यांनी फुलून गेलेल्या दिसतात. त्यासोबत आता आॅनलाईन खरेदीचा पर्यायही उपलब्ध आहे. मुलींसाठी लाँग श्रग, हायनेट कुर्ती,स्कार्फ नेट वुलन कुर्ती,   थंडीमध्ये पार्टीला जायचे असेल  आणि वनपिस घालणार असाल  तर त्यासाठी डेनिमचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. हिवाळ्यात आवडीचा स्कर्ट परिधान करायचा असेल तर पाय झाकण्यासाठी स्टॉकिंग्ज बाजारात उपलब्ध झाले आहेत.  आजकाल कॉलेजला जाणाºया तरुणाईमध्ये हुडचा (झिपर) पर्याय अधिक वापरला जात आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या विंटर कॅप, मफलर, नेटेड टी शर्ट यासोबतच लेदर जॅकेटची जास्त क्रेझ पाहायला मिळते. थंडीपासून बचावासोबतच डॅशिंग आणि कुल लुक यामध्ये दिसतो. नुकतीच थंडी वाढली आहे. थंडीमध्ये सकाळी बाहेर पडायचे म्हटले तर बाहेरची थंडी अंगावर शहारे आणते. पूर्वी थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटरचा वापर केला जायचा. हल्ली घरातील जुन्या स्वेटरकडे कोणी डोकावत नाही. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नवीन ट्रेण्ड नुसार बाजारात विंटर कलेक्शन उपलब्ध आहेत. ज्याने ऊब तर मिळतेच शिवाय छान लुकही येतो. वेगवेगळे जॅकेट्स स्कार्फ , स्टोल तसेच वेगवेगळ्या रंगाचे आणि पॅटर्नचे श्रग, शॉल असे अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत, असे न्यू आर्टस् महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रीती झांबरे यांनी सांगितले.गेल्या काही दिवसांपासून चांगलीच थंडी जाणवत आहे. परंतु थंडीपासून बचावासोबत उत्तम व्यक्तिमत्त्व दिसणेही महत्वाचे आहे. रोज काय नवीन ड्रेसिंग करायचे हा प्रश्न असतोच. परंतु अनेक पर्याय आज बाजारात उपलब्ध आहेत. परंतु लेदर जॅकेट आणि वेगवेगळ्या मफलर याकडे मुले जास्त आकर्षित होताना दिसतात, असे न्यू आर्टस् महाविद्यालयातील विद्यार्थी अंकुश कोरे यांनी सांगितले. 

काळासोबत नवनवीन फॅशन ट्रेंड आल्यामुळे थंडीपासून बचावासोबत फॅशनचाही विचार करताना ग्राहक दिसतो. आम्ही पण नवनवीन फॅशन आणि ग्राहकांच्या मागणीचा विचार करून वेगवेगळ्या व्हरायटी ठेवण्याचा प्रयत्न करतोय, असे नगर येथील विक्रेते सत्येंद्र यादव यांनी सांगितले.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर