शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग बंद तरीही जावईबापूंची कमाई जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 13:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाच्या भितीने अहमदनगर एमआयडीसीसह जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचे चाक रुतले आहे़ मात्र राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांचे जावई असलेले आमदार अशुतोष काळे हे सध्या सॅनिटायझरचे जोरात मार्केटींग करत आहेत़ त्यांनी नागापूरसह इतर एमआयडीसीतील कारखान्यांना सॅनिटायझरची विक्री करत लाखोंची कमाई सुरू केली आहे़ त्यामुळे जावईबापूंच्या सॅनिटायझरची चर्चा सध्या कोपरगाव आणि शेवगाव या दोन्ही तालुक्यात आहे़.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : कोरोनाच्या भितीने अहमदनगर एमआयडीसीसह जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचे चाक रुतले आहे़. मात्र राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांचे जावई असलेले आमदार अशुतोष काळे हे सध्या सॅनिटायझरचे जोरात मार्केटींग करत आहेत़. त्यांनी नागापूरसह इतर एमआयडीसीतील कारखान्यांना सॅनिटायझरची विक्री करत लाखोंची कमाई सुरू केली आहे़. त्यामुळे जावईबापूंच्या सॅनिटायझरची चर्चा सध्या कोपरगाव आणि शेवगाव या दोन्ही तालुक्यात आहे़. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझरचा वापर अचानक वाढला आहे़ कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले़ हे लॉकडाऊन दीड महिन्यांपासून सुरू आहे़. त्यामुळे सर्वच कारखाने बंद आहेत़ परंतु, राष्ट्रवादीचे कोपरगावचे आमदार अशुतोष काळे यांनी कोरोनातही संधी शोधली़ सॅनिटायझरची निर्मिती सुरू केली़. अत्यावश्यक सेवा असल्याने त्यांना परवानगीही वेळेत मिळाली़. त्यामुळे कोपरगावचे सॅनिटायझर एकदम जोरात आहेत़. त्यात काळे यांच्या सासूबाई जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत़. सासूबार्इंना मानणारेही अनेकजण असल्याने त्यांची सॅनिटायझर विक्रीसाठी जावईबापूंना अप्रत्यक्षरित्या मदतच झाली़. याशिवाय काळे यांचे सासरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांचे पती माजी आमदार चंद्रशेखर (भाऊ) यांचे जिल्ह्यात वलय आहे़. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे़. तसेच त्यांच्याकडे एक कारखाना आणि शिक्षणसंस्था आहेत़. त्यामुळे त्यांना जावईबापूंच्या सॅनिटायझरची गरज पडणारच आहे़. त्यामुळे जावईबापूंचे साईनटायझर सध्या जोरात असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे़.