शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या निकालाआधीच तंत्रनिकेतनचे प्रवेश सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:44 IST

दहावीचा निकाल अजून जाहीर झालेला नसतानाही राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाने तंत्रनिकेतनची (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.

विनोद गोळेपारनेर : दहावीचा निकाल अजून जाहीर झालेला नसतानाही राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाने तंत्रनिकेतनची (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच तंत्रनिकेतनसाठी अर्ज भरावे लागणार आहेत. यातून राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये तंत्र शिक्षण शाखेकडे जाण्याचा कल वाढून तंत्रनिकेतन महाविद्यालयांनाही संजीवनी मिळणार आहे़राज्यात दहावीनंतर पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमात माहिती तंत्रज्ञान, मेकॅनिकल, अ‍ॅटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशनसह इतर विभागांचा समावेश असतो़ अकरावी, बारावीनंतर अभियांत्रिकीला जाण्याऐवजी दहावीनंतरच तीन वर्षे तंत्रशिक्षण घेण्याच्या या पॅटर्नकडे दरवर्षीच्या उशिरा प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थीसंख्या काही प्रमाणात रोडावली होती़ यामुळे राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालये अडचणीत आली होती.गुणपत्रिका थेट तंत्र शिक्षण विभाग घेणारदहावीच्या विद्यार्थ्यांनी निकालाआधीच तंत्रनिकेतन महाविद्यालयात ३० मे ते १८ जून दरम्यान आॅनलाईन नोंदणी करायची आहे़ यात विद्यार्थी कोणत्या तालुक्यातील, कोणत्या शाळेतून दहावीत शिक्षण घेतले?, ही माहिती तंत्र शिक्षण विभागाकडे राहणार आहे़ विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल लागल्यावर तंत्र शिक्षण विभाग थेट संबंधित विद्यार्थ्याचा निकाल महाराष्ट राज्य परीक्षा मंडळाकडून घेऊन लगेच तंत्रनिकेतन महाविद्यालयांची गुणवत्ता यादी तयार करण्याची नवी पद्धत राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ़ अभय वाघ यांच्या संकल्पनेतून साकारली जाणार आहे़राज्यात दरवर्षी २६ जूननंतर तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया सुरू होते़ मात्र त्यात विद्यार्थी व संस्थांचे मोठे नुकसान होत होते़ त्यामुळे आम्ही यावर्षीपासून तंत्रशिक्षणाची प्रकिया महिनाभर आधीच सुरू केली आहे. तीस मे ते अठरा जूनपर्यंत नोंदणी प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली आहे. विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे सुरू करावी़ यात विद्यार्थ्यांची शाळेची व इतर माहिती घेतली जाणार आहे़ यातून विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे़ लगेच निकालपत्रक देण्याची गरज नाही़ - डॉ़अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई.दहावीच्या निकालानंतर धावपळ होण्यापेक्षा आधीच विद्यार्थ्यांची गुणपत्रिकेशिवाय सुरू केलेली तंत्रनिकेतनची प्रवेशप्रक्रिया चांगली आहे़ -योगिता फापाळे, विद्यार्थिनी, तंत्रशिक्षण विद्यालय, अवसरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा