शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक रिंगणात उतरण्याआधीच तरुणाईत रंगतोय कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच तरुणाईत उत्साह संचारला आहे. सोशल मीडियाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच तरुणाईत उत्साह संचारला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपाल्या नेत्याची ध्वनिचित्रफीत तयार करून निवडणूक प्रचारासाठी उपयुक्त शब्द रचना असणाऱ्या पार्श्वगीताच्या ओळीचा वापर करत निवडणूक वातावरण निर्मितीत तरुणाई मग्न झाली आहे. या माध्यमातून आवडता गावपुढारी, निवडणूक लढवू इच्छिणारा मित्र, कुटुंबातील सदस्य निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे संकेत या माध्यमातून दिले जात आहेत.

नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात २३ डिसेंबरपासून झाली. सुरुवातीच्या दोन दिवसांत फक्त नऊ गावांतील २९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. राजकीय नेते आपापली रणनीती ठरविण्यात गुंतलेले आहेत. अजून निवडणूक लढतीचे चित्रही स्पष्ट झालेले नाही; परंतु तरीही उत्साही कार्यकर्त्यांची उत्क॔ंठा शिगेला पोहोचली असून आपला नेता कसा प्रभावी आहे, हे ठासून सांगण्यासाठीच लोकप्रिय गीतातील निवडणूक साजेल, अशी काव्य ओळीतून आपली भावना प्रकट करताना परस्पर विरोधी चित्रफिती मोबाइलवर व्हायरल होत आहेत. निवडणूक पूर्व वातावरण निर्मितीत त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे.

---

ही आहेत लक्षवेधी गीते...

वातावरण निर्मितीत प्रामुख्याने समाविष्ट असलेली काही निवडक लोकप्रिय गीते अशी : संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के, गगन कहे विजय भव, विजय भव गगन कहे विजय भव... यासह आपल्या नेत्याचा प्रभाव व्यक्त करण्यासाठी हो हो तो पत्ता करतो, गुल पावरफुल

पत्ता करतो, गुल पावरफुल हाय आमचा नेता, लय पावरफुल.. काव्यपद वापरण्यात येते. त्याला विरोधकाचे प्रत्युत्तरही तेवढेच दमदार मिळताना दिसते. आपले कॉन्टॅक्ट जबर, तुला नाय खबर, कधी काळी ढगात जाशील, नाड्याच्या वार्ता करू नको, तू फोटोत चिपकून राहशील, दोस्तांच्या मनातला दिलदार राजा मी पॉवर दमदार आहे किंवा धुरळा धुरळा धुरळा रं धुरळा धुरळा धुरळा कर लेका, नजर धारदार माणूस दमदार, राजाचं जिगर पब्लिक फिगर धुरळा.