शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बडग्यानंतरही वाळूउपसा सुरूच

By admin | Updated: July 4, 2016 23:47 IST

अकोले : महसूल विभागाने तालुक्यातील वाळू तस्करीच्या मुसक्या आवळण्यासाठी कारवाईचा बडगा उचलला असून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात वाहनांवर दंडासह ‘आरटीओ’कडून कारवाई केली आहे.

अकोले : महसूल विभागाने तालुक्यातील वाळू तस्करीच्या मुसक्या आवळण्यासाठी कारवाईचा बडगा उचलला असून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात वाहनांवर दंडासह ‘आरटीओ’कडून कारवाई केली आहे. मात्र वाळू तस्करीला आळा बसला नाही. उलटपक्षी अवैध वाळू व्यवसायाला बरकत आली असून महसूल विभाग कारवाई करताना दुजाभाव करत असल्याचे बोलले जात आहे. चालू आर्थिक वर्षात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात वाहनांवर तहसीलदारांच्या पथकाने कारवाई केली. दंडाची रक्कम भरूनही वाळू तस्करी आटोक्यात येताना दिसत नाही. अवैध वाळूवर कारवाई करताना दुजाभाव केला जात असल्याची व कोतूळ, राजूर, देवठाण भागातील अवैध वाळूबाबत नरमाईचे धोरण घेतले जात असल्याची चर्चा तहसील परिसरात आहे. वाहनांतील वाळूचे मोजमाप करतानाही दुजाभाव केला जातो.तालुक्यात प्रवरा नदीपात्रातील वाळू काढण्यासाठी कळस बुद्रुक येथील दोन, तर कुंभेफळ येथील एका ठिकाणचा महसूल प्रशासनाकडून अद्याप लिलाव झालेला नाही. तरी अकोल्यात पावसाळ्याच्या तोंडावर वाळू साठे वाढले कसे, असा प्रश्न आहे. दरम्यान गौणखनिजाच्या दंडात्मक कारवाईच्या रकमेत तिपटीने वाढ झाली आहे. मार्च २०१६ अखेर एकूण ७० वाहनांवर कारवाई करून ३३ लाख ९३ हजार ५२८ रुपये दंड वसूल करण्यात आला. मात्र एकाही वाहनावर आरटीओची कारवाई दाखवण्यात आली नाही. या महसूल वर्षात सात गाड्यांवर आरटीओची कारवाई करण्यात आल्याने दंडाचा आकडा मोठा दिसत आहे. वाळू वाहतुकीसाठी आता गाढवांचा उपयोग होत आहे. महसूल वाहनांवर कारवाई करते, पण आता गाढवांवर कशी कारवाई करायची, अशा पेचात प्रशासन आहे. (तालुका प्रतिनिधी)अवैध वाळू रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम हाती घेतली असून लवकरच अवैध वाळूला तालुक्यात पूर्ण आळा बसेल. या महसूल वर्षात सात वाहनांवर गौणखनिजच्या नियमाप्रमाणे ‘दंडाची’ व ‘आरटोओ’ कारवाई करण्यात आली आहे. दंड आकारताना कोणताही दुजाभाव केला जात नाही. समन्याय कारवाई सुरू आहे.- जगदीश गाडे, नायब तहसीलदार