शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस परतला तरीही जनावरांना छावणीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 16:05 IST

पावसाळ्याच्या सुरूवातीस काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. यावर्षी चांगला पाऊस पडेल म्हणून चार महिन्यांपासून छावणीत असलेली जनावरे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने एका दिवसात छावणीतून घरच्या दावणीला नेऊन बांधली.

अशोक मोरेकरंजी : पावसाळ्याच्या सुरूवातीस काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. यावर्षी चांगला पाऊस पडेल म्हणून चार महिन्यांपासून छावणीत असलेली जनावरे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने एका दिवसात छावणीतून घरच्या दावणीला नेऊन बांधली. काही गावातील छावण्या तर जनावराअभावी बंद पडल्या, तर काही छावण्या चालूच होत्या. पावसाळ्याचा दिड महिना होऊन गेला तरी पाऊसच न झाल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या दावणीची जनावरे परत छावणीच्या प्रतीक्षेत आहेत.करंजी परिसरातील घाटसिरस, सातवड, निंबोडी, दगडवाडी येथील छावण्यातील जनावरे शेतकºयांनी थोडासा पाऊस पडताच घरी नेली. त्यामुळे छावण्या बंद झाल्या. तर काही छावणीचालक छावणी बंद करण्याच्या तयारीत होते. मात्र पाऊस झाला तरी महिनाभर जनावरांना परिसरात चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांच्या मागणीमुळे काही छावण्या चालूच होत्या. पावसाळ्याच्या सुरुवातीस काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला.त्यानंतर पावसाळ्याचे दोन महिने होत आले तरी या भागात पाऊस फिरकला नाही.जनावरांच्या चाºयाची व पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्र झाली. पाऊस लांबल्याने पशुधन पुन्हा संकटात सापडले. बंद करण्यात आलेल्या छावण्या पुन्हा सुरू कराव्यात, किंवा बंद झालेल्या छावण्यांमधील जनावरे इतर छावण्यात समाविष्ट करण्याची त्रिभुवनवाडी, निंबोडी, दगडवाडी, घाटसिरस, सातवड या भागातील शेतकरी मागणी करीत आहेत. करंजी, भोसे (काराचा माथा), जोहारवाडी, लोहसर, राघु हिवरे, कौडगाव, वैजुबाभुळगाव या गावातील छावण्या मात्र सुरू आहेत.जनावरे घरी नेल्याने दगडवाडीची छावणी बंद करण्यात आली होती. शेतकºयांच्या मागणीमुळे येथील छावणी पुन्हा चालू करण्यात आली. - स्वाती शिंदे, सरपंच, दगडवाडीया भागातील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. शेतकºयांच्या मागणीनुसार या भागातील बंद छावण्यांना त्वरित परवानगी देण्यात येणार आहे. तसेच सुरु असलेल्या छावण्यांमध्ये जनावरे समाविष्ट करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - नामदेव पाटील, तहसीलदार, पाथर्डी

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर