शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

तेरा शेतकरी कंपन्यांची स्थापना

By admin | Updated: October 30, 2023 11:04 IST

अहमदनगर : राज्य सरकारच्या आत्मा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १३ शेतकरी कंपन्यांची स्थापना करण्यात आली

अहमदनगर : राज्य सरकारच्या आत्मा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १३ शेतकरी कंपन्यांची स्थापना करण्यात आली असून, या कंपन्यांना जागतिक बँकेच्या एम़ए़एस़पी़ प्रकल्पातून सुमारे ९७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले व उपसंचालक संभाजी गायकवाड यांनी दिली़जिल्ह्यात १४ शेतकरी कंपन्यांची स्थापना करावयाची होती़ त्यापैकी पाच कंपन्या स्थापनेची कार्यवाही पूर्ण झाली असून, उर्वरित आठ कंपन्या स्थापन करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे़ या कंपन्यांच्या माध्यमातून विविध शेतमालावर प्रक्रिया आणि उत्पादन करण्यात येणार आहे़ शेतकरी कंपनीमार्फत उत्पादित माल राज्यासह परराज्यात आणि देशाबाहेरही एक्स्पोर्ट करण्यावर प्राधान्य राहणार आहे़ शेतकरी कंपनीसाठी आत्माअंतर्गत शेतकरी गट स्थापन करण्यात आले होते़ या शेतकरी गटांच्या माध्यमातून शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात येत आहे़ त्यासाठी जागतिक बँकेकडून एका कंपनीस साडेसात लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत असून, उर्वरित भागभांडवल शेतकऱ्यांना उभे करायचे आहे़ कंपनी स्थापनेमुळे शेतीमालावर थेट प्रक्रिया करणे आणि विक्री करणे सुलभ होणार आहे़(प्रतिनिधी)राहात्यात पहिली महिला कंपनीराहाता परिसरात महिलांची शेतकरी कंपनी स्थापन करण्यात येत आहे़ या कंपनीच्या क्षमताबांधणीचे काम पूर्णत्वाकडे असून, महिलांची ही कंपनी राज्यातील पहिली महिला शेतकरी कंपनी ठरणार आहे़ त्यामुळे महिलाही प्रक्रिया आणि उत्पादक होणार असून, कंपनीच्या मालक होणार आहेत़या आहेत १३ कंपन्याराहाता ग्रामोद्योग (राहाता), अमरसिंह (कर्जत), फार्मसीस (पारनेर), दत्तकृपा (शेवगाव), गर्भगिरी (वांबोरी, ता़ राहुरी) या पाच कंपन्यांची नोंदणी कंपनीअ‍ॅक्ट कायद्यानुसार पूर्ण झाली आहे़ तर आदर्श उत्पादक कंपनी (पिंप्री लौकी), माऊली शेतकरी उत्पादक संघ (श्रीगोंदा), ज्ञानदीप उत्पादक संघ (कुकाणा), पुण्यस्तंभ उत्पादक संघ (पुणतांबा), जाणता राजा उत्पादक संघ (टाकळीभान), आदर्श साई माऊली उत्पादक संघ (दहिगाव बोलका), साकुर पठार उत्पादक संघ (साकुर), साई प्रवरा उत्पादक संघ (कोल्हार) या आठ उत्पादक शेतकरी कंपन्याची नोंदणी अंतिम टप्प्यात आहे़ ‘गर्भगिरी’ची भरारीवांबोरी येथील गर्भगिरी शेतकरी उत्पादक कंपनीने अन्नधान्य व बीजप्रक्रिया प्रकल्पाची उभारणी सुरु केली आहे़ या प्रकल्पासाठी २२ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, मशिनरीसाठी ७ लाख व युनिट बांधकामासाठी १५ लाख खर्च अपेक्षित आहे़ या कंपनीची खरीप हंगामात २१ लाख ६० हजारांची उलाढाल झाली असून, सुमारे ६ कोटी रुपयांचा कांदा उत्पादीत करणार आहे़ गंगाधर चिंधे यांनी कंपनीसाठी जमीन दिली आहे़