कोपरगाव : संजीवनी उद्योग समूह, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने कोरोना नियम पाळून कारखाना कार्यस्थळावर आराध्य दैवत हनुमान मंदिरात कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांच्या हस्ते श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी (दि.१०) करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, कामगार नेते मनोहर शिंदे, कामगार संचालक वेणुनाथ बोळीज, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, सहायक स्थापत्य अभियंता राजेंद्र पाबळे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी कामगार अधिकारी प्रदीप गुरव, वर्क्स मनेजर के. के. शक्य, मुख्य अभियंता विवेक शुक्ला, सचिव तुळशीराम कानवडे, मुख्य लेखापाल एस. एन. पवार, कायदे सल्लागार विधिज्ञ बाळासाहेब देशमुख, किरण म्हस्के, केन मॅनेजर गोरखनाथ शिंदे, ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, साखर गोडाउन प्रमुख भास्कर बेलोटे, कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने, प्रवीण गिरमे, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे, संगणक विभाग प्रमुख रमाकांत मोरे, महेश गायकवाड, चंद्रकांत जाधव, वसंत थोरात, स्वीय सहायक रंगनाथ लोंढे, आयुब पठाण, बाळासाहेब पानगव्हाणे, आरोग्य विभागाचे परमेश्वर खरात उपस्थित होते.
सहकारमहर्षी कोल्हे कारखाना स्थळावर श्रींची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST