शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधील विशाल गणपती मंदिरात ढोल-ताशांच्या गजरात गणेशाची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 14:26 IST

विशाल गणपती मंदिरातील विशाल गणेशाच्या मूर्तीसमोरच पार्थिव गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.

अहमदनगर : शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री. विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलीस अधिक्षक इशू सिंधू यांच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. विविध ढोल पथकांनी ग्रामदैवताला सलामी दिली. ढोल ताशांच्या गजरात आणि गणपत्ती बाप्पा मोरयाच्या गजरात बाप्पांचे दिमाखात आगमन झाले.श्री. विशाल गणपती मंदिरातील विशाल गणेशाच्या मूर्तीसमोरच पार्थिव गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, सचिव पंडित खरपुडे, पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह भाविकांची मोठी गर्दी होती. आरतीच्या वेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.यावेळी विविध ढोल पथकांनी वाद्यांचा निनाद केला. तसेच पथकांनी पहिले वादन करून विशाल गणपतीला सलामी दिली. भगव्या रंगातील कुर्ता, फेटा, चंद्रकोरी टिळा अशा पोशाषात ढोल पथकांतील तरुणांनी विविध तालातील प्रात्यक्षिके सादर केली. यावादनाने भाविकांची मने जिंकली.अकरा दिवसांच्या गणेशोत्सवात विशाल गणपती मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती. तसेच प्रसाद, पूजाच्या साहित्याची दुकानेही थाटली आहेत. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024