शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नवीन शाळा व्यवस्थापन समित्या स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील शाळा व्यवस्थापन समित्यांची मुदत जून २०२० मध्येच संपली होती. मात्र, कोरोना ...

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील शाळा व्यवस्थापन समित्यांची मुदत जून २०२० मध्येच संपली होती. मात्र, कोरोना संकटात शाळा कधी सुरू होतील हे नक्की नव्हते. यामुळे राज्य शासनाने या समित्यांच्या नव्याने निवडी न करता, शाळा सुरू होईपर्यंत आहे त्या समित्यांनाच मुदतवाढ दिली होती. मात्र, आता या समित्यांना दिलेली मुदतवाढ संपवून नवीन शाळा व्यवस्थापन समित्या तत्काळ स्थापन कराव्यात, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

लहान बालकांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण अधिनियम २००९ नुसार मिळणारे शिक्षण आनंददायी असावे. यातून सर्वगुणसंपन्न पिढी तयार व्हावी, हे प्राथमिक शिक्षणाचे मूलभूत ध्येय आहे. हे साध्य होण्यासाठी पालक-शिक्षक आणि प्रशासनात शाळा व्यवस्थापन समिती महत्त्त्वाचा दुवा म्हणून कार्य करते. ज्या शाळा व्यवस्थापन समितीचा कारभार उत्कृष्ट राहतो त्या शाळेला भौतिक सुविधा, लोकसहभाग लाभतो. शिक्षक-पालकांत समन्वय राहतो. त्यामुळे शाळेचा गुणात्मक आलेख उंचावला जातो. म्हणून शाळा व्यवस्थापन समित्यांना विशेष महत्त्व आहेच. २ वर्षे मुदतीसाठी स्थापन होणाऱ्या या समितीत शाळेतील मुलांच्या पालकांची निवड केली जाते. शेवगावातील बऱ्याचशा शाळा व्यवस्थापन समित्यांची मुदत जून २०२० रोजीच संपली होती. मात्र, कोरोना पार्श्वभूमीवर या समित्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. राहिलेल्या शाळांच्या समित्यांची मुदतही जून २०२१ रोजी समाप्त होणार आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समित्यांच्या नव्याने निवडी करण्यात याव्यात, अशी मागणी भावीनिमगावचे सरपंच आबासाहेब काळे, उपसरपंच संतोष चव्हाण, गोविंद मुंगसे, माधव काळे, रामकृष्ण मुंगसे आदींसह पालकांनी केली आहे.

----

कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता ऑगस्ट २०२० मध्ये मुदत संपलेल्या शाळा व्यवस्थापन समिती निवडीच्या कार्यक्रमाला राज्य शासनाने सप्टेंबर २०२० मध्ये मुदतवाढ दिलेली होती. नवीन समित्यांच्या निवडीचे आदेश अद्याप प्राप्त नाहीत. आदेश येताच त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल.

-रामनाथ कराड,

गटशिक्षणाधिकारी, शेवगाव

----

शाळेसंबंधी अनेक प्रश्न हे गावपातळीवरील असतात. ते सोडवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य नेहमीच अधोरेखित झाले आहे. लोकसहभागातून शाळा मूलभूत, भौतिक सुविधेने संपन्न होण्यासाठी समितीने प्रयत्नशील असावे, अशी पालकांना अपेक्षा असते. मात्र, अलीकडील काळात शाळांच्या व्यवस्थापन समित्या राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा विषय बनत आहेत.

-रामकृष्ण मुंगसे,

पालक, भावीनिमगाव