शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
6
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
7
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
8
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
9
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
10
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
11
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
12
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
13
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
15
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
16
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
17
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
18
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
19
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
20
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तीचे पलायन; ग्रामस्थ, पोलिसांनी पाठलाग करुन पकडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 14:22 IST

एका साठ वर्षीय महिलेचा कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आला. यानंतर तिच्या घरातील एका व्यक्तीने घरातून ठोकली. परंतु ग्रामस्थ, पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले. यानंतर त्याला तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ही घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रूक येथे घडली. 

नेवासा : एका साठ वर्षीय महिलेचा कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आला. यानंतर तिच्या घरातील एका व्यक्तीने घरातून ठोकली. परंतु ग्रामस्थ, पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले. यानंतर त्याला तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ही घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रूक येथे घडली. नेवासा तालुक्यात दीड महिन्यानंतर कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला आहे. कल्याण येथून आलेल्या साठ वर्षीय महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी रविवारी दिली. कल्याण येथून २० मे रोजी सदर महिला नेवासा बुद्रुक येथे आल्यानंतर तिला जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. २२ मे रोजी तिला त्रास होऊ लागल्याने प्राथमिक तपासणी करून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी आलेल्या अहवालातून सदर महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आणखी कोण, कोण व्यक्ती आल्या आहेत याची चौकशी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.  संपर्कातील व्यक्तींना स्त्राव तपासणीसाठी पाठवले असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.दरम्यान, या महिलेच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध प्रशासनाने सुरू केला. त्याचवेळी  महिलेच्या घरातील एका व्यक्तीने घरातून धूम ठोकली. सदर व्यक्ती गावातील स्मशानभूमीकडे पळाला. यावेळी गावातील नागरिक  व पोलीस निरीक्षक रणजित डेरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रताप दहिफळे, निवृत्त आर्मी मेजर बर्डे, पोलीस मित्र संतोष गायकवाड यांनी त्याला पाठलाग करून पकडले. तपासणीसाठी त्यास रुग्णालयात पाठविलेआहे.जिल्हा परिषद शाळेची पाहणी नेवासा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत जाऊन तहसीलदार रुपेश सुराणा, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.मोहसीन बागवान, डॉ.रवींद्र कानडे, आरोग्य सेवक शंकर मालदोडे यांनी पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.सोमनाथ यादव, डॉ.राहुल चव्हाण व ग्रामस्तरीय दक्षता समितीला सदस्यांना सूचना केल्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याNevasaनेवासा