शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या व्याजदरात समानता; १ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:32 IST

राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या ठेवीवर जादा व्याजदराचे आमिष व वारेमाप कर्ज वितरण याला लगाम घालण्यासाठी सहकार नियामक मंडळाने ठेवी व कर्जावरील व्याज, कमाल कर्ज मर्यादा ठरविण्यात आल्या आहेत.

बाळासाहेब काकडे  । श्रीगोंदा : राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या ठेवीवर जादा व्याजदराचे आमिष व वारेमाप कर्ज वितरण याला लगाम घालण्यासाठी सहकार नियामक मंडळाने ठेवी व कर्जावरील व्याज, कमाल कर्ज मर्यादा ठरविण्यात आल्या आहेत. ठेवीवर जास्तीत जास्त १०.५ टक्के व्याज आकारणी, स्वनिधीतून देणाºया कर्जावर १२ टक्के, कर्जावर १४ टक्के व विनातारण कर्जावर १६ टक्के असे व्याजदर निश्चित करण्यात आले असून हे व्याजदर राज्यातील पतसंस्थांमध्ये सारखे असणार आहेत. या व्याजदराची १ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी होणार आहे. ही लक्ष्मणरेषा ओलांडणाºया पतसंस्थांवर कारवाई करण्यात येणार आहे. सहकार नियामक मंडळाच्या उपसचिवांनी गत आठवड्यात हा आदेश जारी केला आहे. ज्या पतसंस्थांकडे खेळते भांडवल एक कोटीपेक्षा कमी आहे, अशा पतसंस्थांना एका कर्जदारास ५० हजारापेक्षा जादा कर्ज देता येणार नाही. एक कोटीपेक्षा जादा खेळते भांडवल असेल तर त्यांनाही लावलेल्या निकषावर कर्ज वितरण करावे लागणार आहे. संस्थेच्या उपविधीमध्ये काहीही नमूद असले तरी नियामक मंडळ जे जाहीर करेल त्याप्रमाणे ठेवी व कर्जावरील कमाल व्याजदर सर्व बिगर कृषी पतसंस्थांना बंधनकारक राहतील. अगोदर जे कर्ज वितरण अगर ठेवी ज्या व्याज दराने स्वीकारल्या आहेत, त्याची मात्र  पूर्वीच्या नियमानुसार आकारणी होईल. त्यामुळे काही पतसंस्थांनी ठेवी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे फलक लावले आहेत. त्यामुळे ठेवी ठेवणारांना नवीन दराने ठेवी ठेवाव्या लागणार आहेत. 

शासनाने पतसंस्थांची बँकांशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने चांगला निर्णय आहे. त्यामुळे पतसंस्थांना आर्थिक शिस्त लागेल. जादा दराने ठेवी घेऊन वारेमाप कर्ज वितरण करणाºया मंडळींना आळा बसेल, असे विठाई पतसंस्थेचे अध्यक्ष मिठू पर्वती शिंदे यांनी सांगितले. 

    नियामक मंडळाने बिगरशेती सहकारी पतसंस्थेत व्यवहार करणारे ग्राहक यांचे हित डोळ्यासमोर ठेवून ठेवी व कर्जावरील व्याजदराबाबत समान धोरण घेतले आहे. त्यामुळे सहकारी संस्थांमध्ये बळकटी व आर्थिक शिस्त येईल, असे श्रीगोंद्याचे सहायक उपनिबंधक रावसाहेब खेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEconomyअर्थव्यवस्थाBanking Sectorबँकिंग क्षेत्रGovernmentसरकार