संगमनेर : शिक्षक आपली प्रतिभा वापरून प्राथमिक शाळेत विद्यार्थी हिताचे अनेक कल्पक उपक्रम राबवत आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे, असे साहित्यिक, शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर यांनी सांगितले.
संगमनेर तालुका गुरुकुल मंडळ, शिक्षक समिती तसेच विविध संस्थांकडून शनिवारी (दि. १८) आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे गटनेते अजय फटांगरे, समितीचे राज्य उपाध्यक्ष रा.या. औटी, गटशिक्षणाधिकारी के.के. पवार, गुरुकुल महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वृषाली कडलग, गुरुकुलचे जिल्हा कार्याध्यक्ष सुखदेव मोहिते, मच्छिंद्र दळवी, गोकुळ कहाणे, संभाजी फड, मधुकर मैड, बंडू हासे, ज्ञानेश्वर नागरे, भागवत कर्पे आदी उपस्थित होते.
पुरस्कार कोणता आहे याला महत्त्व नसते. त्यातून आपली काम करण्याची दिशा योग्य आहे, ते समजते आणि प्रेरणा मिळते. स्वत:चे पैसे घालून शिक्षक आपल्या शाळा अंतर्बाह्य देखण्या करत आहेत. ग्रामीण भागासाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. शाळांचे अंतर्बाह्य स्वरूप बदलविण्याबरोबरच शिक्षकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाड्यावस्त्यांवर जाऊन मुलांना शिकविले, असेही डॉ. कळमकर म्हणाले.
कार्यक्रमासाठी रमेश आहेर, गोरक्ष हासे, शिवाजी नागरे, ज्ञानेश्वर नागरे, भास्कर मोहिते, श्रीकांत साळवे, उत्तम गायकवाड, विठ्ठल कडूस्कर, गोरक्ष मदने, भास्कर हासे, श्रीकांत बिडवे, सुनील टकले, संजय कानवडे, सचिन अंकाराम, राजाराम कानवडे, विलास वाकचौरे, मीना साबळे, प्रतिभा नागरे, छाया करकंडे, प्रमिला हासे, राम हांडे, संजय नवले, अमोल जाधव, प्रशांत बैरागी, राजू हासे, किरण कटके, प्रशांत भंडारे, बाबासाहेब गायकवाड यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन अक्षय खतोडे यांनी केले. गोकुळ कहाणे यांनी आभार मानले.
-------------
सन्मानार्थी शिक्षक
गटशिक्षणाधिकारी के.के. पवार यांसह वृषाली कडलग, हरिबा चौधरी, स्मिता जाधव, सुषमा धुमाळ, अशोक शेटे, प्रीती खालकर, ज्योती भोर, कैलास वाघमारे, दत्तू आव्हाड, उमेश काळे, कैलास भागवत, युवराज भाईक, यादव धांडे, शाईन शेख, बाळासाहेब भागवत, मंगल राहाणे, ज्योती घोडे या आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.