शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बॅँजो पार्टीत काम करणारा सुरज झाला इंजिनिअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 13:42 IST

घाणीचे साम्राज्य.. डुकरांचा वावर.. वीज नाही.. सुटीच्या काळात बॅँजो पार्टीत काम.. अशा प्रतिकूल परिस्थितीत श्रीगोंदा शहरातील कैकाडी गल्लीतील सुरज प्रकाश गायकवाड हा मेकॅनिकल इंजिनिअर झाला आहे.

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : घाणीचे साम्राज्य.. डुकरांचा वावर.. वीज नाही.. सुटीच्या काळात बॅँजो पार्टीत काम.. अशा प्रतिकूल परिस्थितीत श्रीगोंदा शहरातील कैकाडी गल्लीतील सुरज प्रकाश गायकवाड हा मेकॅनिकल इंजिनिअर झाला आहे.वेतापासून झाप, कनिंग, टोपले विणण्याचे काम करणाऱ्या आई-वडिलांचे स्वप्न सुरजने पूर्ण केले आहे. शहरातील कैकाडी गल्ली येथे कष्टकरी कैकाडी समाजाची वस्ती आहे. शहरातील प्रमुख चौक असलेल्या शनी चौकाच्या बाजूलाच असलेल्या वस्तीत मुलभूत सुविधा नाहीत.अनेक वडिलधारी मंडळी व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत. घरातील महिलांवरच कुटुंब चालविण्याची जबाबदारी आहे. तरुणही रोजगाराच्या शोधात असतात. येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. येथील मुले मुलींही आता शिक्षणाचा गजर करू लागली आहेत. त्यामुळे समाज परिवर्तन आणि प्रबोधनाचा प्रकाश या गल्लीत येऊ लागला आहे.येथील प्रकाश गायकवाड यांची दहा-बाय दहाची पत्र्याची एक खोली आहे. त्या खोलीत संगीता व प्रकाशने संसार थाटला आहे. त्यांना सुरज व धीरज ही दोन मुले आहेत. प्रकाश झाप, कनिंग विणण्याचे काम करायचे. नंतर त्या व्यवसायात काम शिल्लक न राहिल्याने ते मजुरी करू लागले. पत्नी संगीता यांनीही मुलांच्या शिक्षणासाठी भांडीकुंडी घासायचे काम स्वीकारले.सुरजने श्रीगोंदा येथील महादजी शिंदे विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये मेकॅ निकल इंजिनिअर होण्यासाठी प्रवेश घेतला.त्यावेळी मित्रांनी त्याची इंजिनिअर होणार म्हणून टिंगल केली. ते आव्हान सुरजने स्वीकारले. शैक्षणिक फी भरण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी सुटीच्या दिवशी सुरज बॅँजो पार्टीत ढोलताशा वाजविण्याचे काम करायचा. रात्री कधी रॉकलेच्या दिव्याखाली तर कधी नगरपालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करायचा.सुरजने तिसºया वर्षाची परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. त्याला तिसºया वर्षी ६८ टक्के गुण मिळाले आणि कैकाडी समाजातील सुरज इंजिनिअर झाला. त्याच्या निकालानंतर कैकाडी गल्लीतील तरुणांनी आनंदोत्सव साजरा केला.मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पास झालो. त्यासाठी खूप मेहनत घेतली आणि ही मेहनत कामी आली. आता मला इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेऊन डिग्री मिळवायची आहे. -सुरज गायकवाड, श्रीगोंदा

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा