शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 18:04 IST

येत्या लोकसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीकडे निवडणुक आयोग दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ मतदान यंत्र विरोधी जन आंदोलनाच्या वतीने अरणगाव रोड येथील इंदिरानगर परिसरात ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढून त्याचा दफनविधी करण्यात आला.

अहमदनगर : येत्या लोकसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीकडे निवडणुक आयोग दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ मतदान यंत्र विरोधी जन आंदोलनाच्या वतीने अरणगाव रोड येथील इंदिरानगर परिसरात ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढून त्याचा दफनविधी करण्यात आला.जालिंदर चोभे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मच्छिंद्र तिजोरे, आदिनाथ थोरे, दिपक भिंगारदिवे, संतोष तिजोरे, सनी गायकवाड, कुशाबा काळे, गोरख जाधव, कैलास साळवे, श्याम कांबळे, दिगंबर तिजोरे, संगीता तिजोरे, कमलाबाई मिरपगार आदिंसह नागरिक सहभागी झाले होते.२०१४ मध्ये ईव्हीएम मशीन सेटिंग करुन मतदान घेतले गेले. यामुळे मते चोरी झाली तर काही ठिकाणी व्हीव्हीपॅटने मतदार यादीपेक्षा अधिक मते दाखवली. म्हणूनच एक महिन्याच्या आत सर्व ईव्हीएम मशीन भंगारात काढण्यात आले आहे. काही महिन्यांपुर्वी ईव्हीएम मशीन व व्हीव्ही पॅटचे प्रशिक्षण घेण्यात आले होते. या मशीन तातडीने बदलण्यात आले असून हा कारभार पुर्णत: संशयास्पद आहे. पुर्वी घेतलेले प्रशिक्षण व केलेली खात्री व्यर्थ गेली असून, नवीन मशीनची अचूकता व खात्रीवर प्रश्न चिन्ह असल्याचा आरोप चोभे यांनी केला आहे. लोकशाही टिकविण्यासाठी व ईव्हीएम चे घोटाळे हद्दपार करण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घ्यावे व क्रॉस चेकिंग मत पडताळणीचा अधिकार सर्व उमेदवारांना देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर