शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
3
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
4
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
5
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
6
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
7
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
8
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
9
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
10
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
11
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
12
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
13
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
14
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
15
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
16
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
17
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
18
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
19
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
20
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...

अहमदनगरमधील शहर बससेवा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 11:51 IST

दोन दिवसांपासून बंद असलेली शहर बस सेवा अखेर आज बुधवारी पहाटेपासून सुरू झाली. मंगळवारी दिवसभर झालेल्या चर्चेच्या फे-यानंतर सायंकाळी सहा वाजता अभिकर्ता संस्थेने बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : दोन दिवसांपासून बंद असलेली शहर बस सेवा अखेर आज बुधवारी पहाटेपासून सुरू झाली. मंगळवारी दिवसभर झालेल्या चर्चेच्या फे-यानंतर सायंकाळी सहा वाजता अभिकर्ता संस्थेने बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली. एक महिन्यात किमान २५ ते ३० लाख रुपये देण्याची तयारी दर्शविल्यानंतर अभिकर्ता संस्थेने सेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली.महापालिकेची शहर बस सेवा यशवंत अ‍ॅटो यांच्यामार्फत चालविली जाते. कराराप्रमाणे बस सुरू राहाव्यात आणि नुकसान झाले तरी बस सेवेत खंड पडणार नाही, यासाठी महापालिका दरमहा संस्थेला पाच लाख रुपयांचे अनुदान (नुकसान भरपाई) देते. मात्र दीड वर्षांपासूनचे ८० लाख रुपये थकल्याने आणि सेवेतील अडथळे दूर करण्यात अपयश आल्याने यशवंत अ‍ॅटोचे संचालक धनंजय गाडे यांनी पूर्वसूचनेप्रमाणे सोमवारी (दि.१२) सकाळपासून बस सेवा बंद केली. ऐन परीक्षेच्या काळात बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे दोन दिवसांपासून मोठे हाल झाले. तर महिला, ज्येष्ठ नागरिक यांनाही त्रास सहन करावा लागला.बुधवारी सकाळपासून यशवंत अ‍ॅटोचे धनंजय गाडे आणि महापालिका यांच्यात बैठका सुरू होत्या. महापौर सुरेखा कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपमहापौर अनिल बोरुडे, सभागृह नेते गणेश कवडे, आयुक्त घनश्याम मंगळे, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, माजी सभागृह नेते अनिल शिंदे, गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक सचिन जाधव, सागर बोरुडे, योगिराज गाडे, मुदस्सर शेख, नितीन बारस्कर, दिगंबर ढवण, दत्ता मुद्गल, हनुमंत भूतकर, काका शेळके, अभियंता परिमल निकम उपस्थित होते.या बैठकीनंतर महापौर कदम म्हणाल्या, शहर बस सेवा सुरू ठेवण्याबाबत चर्चा केली. अभिकर्ता संस्थेच्या अडचणी आणि थकीत रक्कमेबाबत तोडगा काढण्यात आला. महापालिकेच्या आर्थिक स्थितीमुळे थकीत रक्कम सध्या देणे शक्य नाही. सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी बस सेवा तातडीने सुरू करण्याची विनंती गाडे यांना केली. याबाबींचा विचार करून त्यांनी बस सेवा सुरू करण्याबाबत सांगितले. 

  • महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा झाली. सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांचा विचार करून बस सेवा बुधवारी (दि.१४)पहाटेपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. थकीत अनुदानापैकी २५ ते ३० लाख रुपये महिनाभरात देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. याशिवाय वाहनतळ आणि इतर अडचणी सोडविण्याबाबत प्राधान्याने लक्ष देण्याबाबत आश्वासन मिळाले. त्यामुळे बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
  • -धनंजय गाडे, संचालक, यशवंत अ‍ॅटो

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिका