शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

राळेगण म्हसोबा येथील २८ एकर सरकारी जमिनीवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 18:59 IST

राळेगण म्हसोबा गावातील सरकारी जमिनीवरील वृक्षांची तोड करुन अतिक्रमण करण्यात आले आहे. या तक्रारीला वर्ष उलटले तरी अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या अतिक्रमणाला व वृक्षतोडीला प्रांताधिका-यांचेच अभय असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

अहमदनगर : नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा गावातील सरकारी जमिनीवरील वृक्षांची तोड करुन अतिक्रमण करण्यात आले आहे. याप्रकरणी हनुमंत बजाबा कचरे व संजय गणपत पवार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी प्रांताधिकारी यांच्याकडे आॅक्टोबर २०१६ मध्ये तक्रार केली होती. या तक्रारीला वर्ष उलटले तरी अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या अतिक्रमणाला व वृक्षतोडीला प्रांताधिका-यांचेच अभय असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.राळेगण म्हसोबा गावातील आडवामाळ येथील गट नं. १४० व गट नं. २७७ या सरकारी गायरान हद्दीतील जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागाने २००५-२००६ मध्ये वृक्षलागवड केली होती. मात्र ही चांगल्या स्थितीतील आणि मोठी झालेली झाडे यंत्राच्या साहाय्याने काढून टाकण्यात आली. या जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले तसेच या जमिनीत बोअरवेलही घेण्यात आला. या सरकारी जमिनीवर संबंधिताने इंदिरा आवास योजनेतून २०१५- १६ साली घरकूल बांधले आहे. या गटाच्या जवळच गुणवडी तलाव असल्याने पाण्याची अवैध पाइपलाइन नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे. याच परिसरातील अनेक लोक या गायरानावर शेळ््या, मेंढ्या व गावरान जनावरे चारण्यास आणतात. मात्र या अतिक्रमणामुळे त्यांनाही अटकाव करण्यात येत आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाºयावर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या गटातील जमिनीची मोजणी करुन पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच पुन्हा वृक्षलागवड करुन सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन करण्यात यावे. या मागणीची दखल न घेतल्यास शेळ््या-मेंढ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

अतिक्रमणप्रकरणी गावातील ६५ लोकांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. यानंतर तत्कालीन सर्कल वाघ व कामगार तलाठी यांनी पाहणी करुन तहसीलदारांनी अहवाल पाठविला आहे. त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.

सर्वच झाडे जळाली कशी?या अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून अधिकाºयांची दिशाभूल केली जात आहे. खोटी माहिती दिली जात आहे. या गटातील सर्वच झाडे दुष्काळामुळे कशी जळू शकतात. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी.- संजय पवार, तक्रारदार

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरforest departmentवनविभाग