शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी, नाही पगाराची हमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 13:25 IST

दुष्काळामुळे आर्थिक अडचणीच्या संकटात सापडलेल्या संसाराला रोजगार हमीच्या कामामुळे आधार मिळाला खरा, पण तीन आठवडे काम होऊनही हाती पगार न आल्याने ‘रोजगार हमी, पण पगाराची नाही हमी’ असा अनुभव मजुरांना येतो आहे.

शेवगाव : दुष्काळामुळे आर्थिक अडचणीच्या संकटात सापडलेल्या संसाराला रोजगार हमीच्या कामामुळे आधार मिळाला खरा, पण तीन आठवडे काम होऊनही हाती पगार न आल्याने ‘रोजगार हमी, पण पगाराची नाही हमी’ असा अनुभव मजुरांना येतो आहे.मिरी पांढरीपूल रस्त्यावरील आपेगाव ते आव्हाणे या दोन किलोमीटरच्या शीव रस्त्याचे काम रोजगार हमीतून सुरू आहे. तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या कामावर ढोरजळगाव, मळेगाव, आपेगाव, आव्हाणे परिसरातील ३१० मजूर काम करीत आहेत. शारदा जनार्धन कोलते, सरला देविदास गिºहे, बाळासाहेब खवले, सुभद्रा विष्णू गिºहे, पांडुरंग दौलत तुजारे, परमेश्वर विष्णू केसभट आदी मजुरांच्या हातांना काम मिळाल्याने दिलासा मिळाला. कामाला तीन आठवडे लोटले तरी पगार न मिळाल्याने मजूर हताश झाले आहेच.आमच्या सर्वांकडे जॉबकार्ड असल्याने सणासुदीसाठी बँक खात्यात पगाराचे पैसे जमा होणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, सावली आदी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत.पाण्यासाठी दाहीदिशापहाटे पाच वाजता आमचा दिवस उगवतो. गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू आहे. पाण्याच्या टँकरचा प्रस्ताव दाखल केल्याचे गाव पुढारी सांगतात. मात्र अजून टँकर सुरू नसल्याने दूरवरून पाणी आणून घरादारातील अन्य सदस्यांच्या स्वयंपाकाची सोय लावून आमची भाकरी बरोबर घेऊन कामावर येतो. रात्रंदिवस आम्हाला रोजगाराच्या लढाईस तोंड द्यावे लागते, असे महिला सांगत होत्या.पदवीधरालाही रोहयोचा आधार४राम शिवाजी पाटेकर हा बी.ए. झालेला युवक रोजगार हमीवर काम करीत आहे. उन्हाळा संपताच पुढील उच्च शिक्षणासाठी जाणार असल्याचे त्याने सांगितले. ग्रामसेवक भगीरथ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली रामजी खोसे, दिगंबर साबळे, शिवाजी शेलार या मुकादमांच्या देखरेखीखाली शीव रस्त्याचे काम सुरु आहे.मजुरांच्या कामाचे बिल बँकेत पाठविले आहेत. दोन दिवसात मजुरांच्या खात्यात पैसे जमा होतील. अ‍ॅपच्या अडचणीमुळे पगार लांबले.- डॉ. विनोद भामरे, तहसीलदार, कर्जत

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर