शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

भारनियमनातही लादला इमर्जन्सीचा ‘भार’

By admin | Updated: May 28, 2014 00:06 IST

चंद्रकांत शेळके, अहमदनगर सहा ते साडेआठ तासांचे भारनियमन, इमर्जन्सी शटडाऊनच्या नावाखाली रात्री-अपरात्री खंडित होणारी वीज अन् त्यात भरीस भर म्हणून पार्‍याने ओलांडलेली चाळिशी,

चंद्रकांत शेळके, अहमदनगर सहा ते साडेआठ तासांचे भारनियमन, इमर्जन्सी शटडाऊनच्या नावाखाली रात्री-अपरात्री खंडित होणारी वीज अन् त्यात भरीस भर म्हणून पार्‍याने ओलांडलेली चाळिशी, अशा कात्रीत सापडल्याने सध्या नागरिक उष्म्याने हैराण झाले आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे ग्रामीण भागातील जनजीवनच जणू विस्कळीत झाले आहे. सध्या ग्रामीण भागासह सर्वत्रच भारनियमनाची अंमलबजावणी होते. मागणी व वसुलीनुसार ठरलेले ग्रुपनिहाय भारनियमन नित्यनेमाने सुरू आहे. परंतु पारा ४० अंशावर गेल्याने उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे घरगुती पंखे, वातानुकूलित यंत्रणा, फ्रिज, कुलर रात्रंदिवस सुरूच असतात. उन्हाळ्याच्या चार महिन्यांत विजेची मागणी एकदमच वाढते. त्यामुळे निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी तातडीचे भारनियमन हा उपाय महावितरणने शोधून काढला आहे. ग्रामीण भागातील बर्‍याच ठिकाणी सिंगल फेजचे काम झाले असले तरी त्यांना भारनियमनातून सुटका मिळालेली नाही. सहा ते तब्बल आडेआठ तास हे नेहमीचे भारनियमन आणि वरून तातडीच्या नावाखाली कधीही, अनिश्चित काळापर्यंत खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. पिठाच्या चक्क्या बंद असल्याने महिलांची तारांबळ उडते. पाच-दहा किलोमीटरची रपेट करत शेजारील गावावरून दळणाची तजवीज करावी लागते. रात्री अंधाराचा फायदा घेऊन चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. पाणीयोजनांचा वीजपुरवठा खंडित केल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. शेतकर्‍यांना तर वीज कधी येते न जाते हेच कळत नाही. उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत असली तरी काही ठिकाणी पाणी टिकून आहे. भाजीपाला, चारापिके, फळबागा तगवण्याची कसरत शेतकर्‍यांपुढे आहे.