शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी संप : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 16:34 IST

राज्य शासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेला तीन दिवसीय संप आजपासून सुरु करण्यात आला.

अहमदनगर : राज्य शासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेला तीन दिवसीय संप आजपासून सुरु करण्यात आला. अहमदनगर जिल्हा राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने काम बंद ठेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले व तीन दिवसीय संप यशस्वी करण्याची हाक देण्यात आली. या संपाला उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी उपस्थित राहून पाठिंबा व्यक्त केला.या तीन दिवसीय लाक्षणिक संपात अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सरकारी कर्मचा-यांच्या तीन दिवसीय संपाचा धसका घेत राज्यसरकारने १४ महिन्यांचा महागाई भत्ता आॅगस्ट महिन्याच्या पगाराबरोबर रोखीने देण्याचा शासन निर्णय काढला. मात्र इतर मागण्या प्रलंबीत असल्याने हा संप यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धरणे आंदोलना दरम्यान मांडव देखील कमी पडल्याने आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडले होते. सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांनी शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. सरकारचा वेळकाढूपणा व कामगार विरोधी धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. जोरदार घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून निघाला. शासनाचा वेळकाढू धोरण, संप तोंडावर असताना कर्मचा-यांना खुश करण्यासाठी काढण्यात आलेला शासन निर्णयाविरोधात चीड व संताप व्यक्त करून उपस्थितांनी आपल्या असंतोषाला वाट करुन दिली. या तीन दिवसीय संपाची दखल घेत शासनाने कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत विचार केला नाही तर आॅक्टोबर २०१८ मध्ये बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला.आंदोलनात सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष बी.बी. सिनारे, कार्याध्यक्ष सुभाष तळेकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, पी.डी. कोळपकर यांनी आपल्या भाषणातून शासनावर टीका केली.या धरणे आंदोलना प्रसंगी शिक्षक संघटनेचे आप्पासाहेब शिंदे, शिक्षकेतर संघटनेचे थोटे सर, बाबासाहेब बोडखे, राजेंद्र कोतकर, प्रा.माणिक विधाते, राजेंद्र लांडे, भाऊसाहेब कचरे, प्रा.सुनिल पंडित आदी उपस्थित होते. या संपात राजपत्रित अधिकारी संघटना, तलाठी संघटना, ग्रामसेवक संघटना, शिक्षक शिक्षकेतर संघटना, कृषी सहाय्यक संघटना, महसूल कर्मचारी संघटना, भुमिअभिलेख, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे व इतर संघटना उतरल्या आहेत. हे संप यशस्वी करण्यासाठी डॉ. मुकुंद शिंदे, देविदास पाडेकर, बाळासाहेब वैद्य, एम.एल. भारदे, संदिपान कासार, दिनकरराव घोडके, विजय काकडे, अरुण शिंदे, सुधाकर साखरे, श्रीकांत शिर्शिकर, पुरुषोत्तम आडेप, रवी डीक्रूज, कैलास साळुंके आदी परिश्रम घेत आहे.सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी, थकित महागाई भत्ता मिळावा, निवृत्तीचे वय ६० वर्ष करावे, पाच दिवसाचा आठवडा जाहीर करावा, खाजगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करावे व रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय