इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या संगमनेर शाखेचे प्रमुख कृणाल प्रदीप मेहता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोडसेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोडसे हा संगमनेरमधील गणेशनगर बँक शाखेत उपशाखा अधिकारी म्हणून काम करतो. त्याने बचत खात्यातील कर्जाचे १ लाख ५४ हजार रुपये लोकांकडून घेतले. हे पैसे बँकेत भरणे अपेक्षित होते. पण गोडसे याने ही रक्कम बँकेत न भरता परस्पर स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. २७ मे २०२० ते ७ जून २०२१ या कालावधीत हा अपहाराचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी गोडसेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निकिता महाले या अधिक तपास करीत आहेत.
बँकेच्या उपशाखाधिकाऱ्याने केला अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST