शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीतील तरुणीनं केलं मरणोत्तर अवयवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 14:34 IST

परमेश्वराने मला परिस्थितीशी संघर्ष करण-या आई - वडीलांच्या पोटी जन्माला घातले. आईने खूप लाड केले. छोटा भाऊ ओकांरशी दररोज हुज्जत घातली. खूप मजा केली.

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : ‘‘परमेश्वराने मला परिस्थितीशी संघर्ष करण-या आई - वडीलांच्या पोटी जन्माला घातले. आईने खूप लाड केले. छोटा भाऊ ओकांरशी दररोज हुज्जत घातली. खूप मजा केली. शाळेत खूप मैत्रीणी भेटल्या, पण माझे हृदय निकामी झाले. त्यामध्ये दोष कुणाचा! मी मृत्युला आनंदाने सामोरे जात आहे. मृत्यूनंतर मात्र माझे डोळे काढा आणि दान करा’’ असे म्हणत अकरावीतील तरुणीनं जगाचा निरोप घेतला. श्रीगोंदा येथील इयत्ता अकरावीत शिकणा-या किरण विकास शिंदे (वय-१७) या मुलीने सामाजिक संदेश देत आज सकाळी जगाचा निरोप घेतला.मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी दौंड येथील डॉ. प्रेमकुमार भट्टड यांनी किरणचे डोळे शस्त्रक्रिया करून पुणे येथील रुबी आय बँककडे पाठवून दिले. किरणच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तीच्या जीवनात सृष्टीचे किरण येणार आहेत. श्रीगोंदा शहरातील विकास शिंदे व सुनीता शिंदे या जोडप्याला किरण आणि ओकांर ही दोन अपत्य. वडील हे टमटम तर आई दुकानामध्ये कामाला. किरणचे हृदय लहानपणापासून कमकुवत होते. आई-वडीलांनी किरणचा आजार बरा होण्यासाठी अखेपर्यत जीव ओतला. डॉ. अनील घोडके व सतिश बोरा यांनी मदत केली.किरण शाळेत हुशार होती. श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतला. हृदयाचा त्रास झाला. मृत्युशी झुंज चालू असताना तिला जाणवले की आपणास जगाचा निरोप घ्यावा लागणार. बारामती येथील डॉक्टरांनी तिला तीन दिवसापूर्वी घरी घेऊन जाण्यास सांगितले.घरी येताना तिने सतिश बोरा यांच्याशी अखेरचा संवाद साधला. ‘‘ काका, मी उद्या मरणार ना! मी कॉलेजला जाऊ शकणार नाही ना! ओकांरशी आता कोण हुज्जत घालणार! काका माझ्यासाठी तुम्ही खुप प्रयत्न केले. मी गेल्यानंतर माझे डोळे दान करा. माझ्या नेत्रदानातून दोघेजण सुंदर जग पाहतील, याचा मला मोठा आनंद होईल’’ या उद्गाराने सतिश बोरा स्तब्ध झाले होते. अखेर आज किरणने जगाचा निरोप घेतला.समाजात वयोवृद्ध माणसे मरणोत्तर नेत्रदान करण्याचे धाडस दाखवत नाहीत. पण अकरावीत शिकणा-या किरणने मरणोत्तर नेत्रदान केले. त्यामुळे किरणचा आदर्श समाजाने घ्यावा. - डॉ. प्रेमकुमार भट्टड, नेत्रतज्ञ

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा