शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

वीज, महागाई, कर्जमाफीत सरकार अपयशी - सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 12:56 IST

अहमदनगर : कर्जमाफी ही तर खूप दूरची गोष्ट आहे. अजून कर्जमाफीची प्रक्रियाही सुरू झालेली नाही. आॅनलाईन प्रक्रियेत ज्येष्ठांचे ठसे ...

अहमदनगर : कर्जमाफी ही तर खूप दूरची गोष्ट आहे. अजून कर्जमाफीची प्रक्रियाही सुरू झालेली नाही. आॅनलाईन प्रक्रियेत ज्येष्ठांचे ठसे उमटत नाहीत. एक महिन्याचा कोळसा साठवून ठेवला होता, असे सरकारनेच जाहीर केले होते. तो गेला कुठे? असा सवाल उपस्थित करीत वीज, महागाई आणि कर्जमाफीबाबत सरकार अपयशी ठरले असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी नगरमध्ये व्यक्त केली.येथील न्यू आर्टस् महाविद्यालयात संवाद यात्रेनंतर खा. सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याने राष्ट्रवादी आक्रमकपणे मोर्चा- आंदोलने करीत आहेत. आम्हाला जनतेला त्रास द्यायचा नाही. या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. सरकारने घाईघाईत कर्जमाफी केली. मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होताच जाहिरातीचे बोर्ड लागले. तसे भारनियमनाबाबतही झाले पाहिजे. २४ तास वीज मिळाली पाहिजे. सरकारकडे भारनियमनाबाबत कोणतेही नियोजन नाही. कर्जमाफीतही अनेक अडचणी आहेत. केंद्र सरकारने ‘वन नेशन वन टॅक्स’ जाहीर केले. ही संकल्पना मुळात आमचीच आहे. परंतु सरकारने आता वन ऐवजी फाईव्ह टॅक्स केले आहेत.सुनील तटकरे यांच्या चौकशीबाबत पत्रकारांनी विचारले असता, त्या म्हणाल्या, सरकारने चौकशी जरुर करावी. परंतु ती राजकीय हेतुने प्रेरीत नसावी. त्यामध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. भगवानगडावरील दसरा मेळाव्याबाबत सुळे यांचे लक्ष वेधले असता, त्याबाबत आपला अभ्यास नसल्याचे सांगून सुळे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. बारमतीवर सर्वांचेच प्रेम आहे. बारामतीत जे काही बोलले जाते, ते देशभर जाते. तसेच ही संवाद यात्रा म्हणजे निवडणुकीची तयारी नसून युवकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आहे. युवक जे बोलतात, तेच आम्ही संसदेत बोलणार, असे त्या म्हणाल्या.--------आरक्षण नको... व्हेरी गुडआरक्षण कोणालाच नको आहे. आरक्षण हे आर्थिक निकषावर द्यायला हवे, अशी मागणी युवकांनी खा. सुळे यांच्याकडे केली. त्यावर सुळे यांनी व्हेरी गुड.... नगरला बेटर फीचर असल्याची प्रतिक्रिया देवून आरक्षणाबाबत अधिक बोलणे टाळले.