कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राजकीय बदल झाला आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांचे कार्यकर्ते प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष या निवडणुकीच्या निमित्ताने समोरासमोर उभे ठाकणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग राबविला जाणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सरपंचपदाचे आरक्षण लांबणीवर पडल्याने अनेकांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. सरपंचपदाचा सस्पेन्स कायम राहिल्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे.
...या ग्रामपंचायतीच्या होणार निवडणुका
मिरजगाव, निमगांव गांगर्डे, चापडगाव, कोंभळी, चिलवडी, थेरवडी, दुरगांव, बेनवडी, भांबोरा, बारडगांव दगडी, बारडगांव सुद्रिक, जलालपूर, पिंपळवाडी, टाकळी खंडेश्वरी, पाटेगाव, मलठण, निमगांव डाकु, चिंचोली काळदात ,डिकसळ, नांदगाव, वालवड, मांदळी, कोकणगाव, बेलगाव, गुरवपिंपरी, रवळगाव, वडगाव तनपुरे, करपडी आखोणी, शिंपोरा, दुधोडी, सिदधटेक, राक्षसवाडी खुर्द, राक्षसवाडी बुद्रुक, तळवडी, धालवडी, नागापूर, बाभूळगाव खालसा, तरडगाव, पाटेवाडी, दिघी, खंडाळा, खांडवी, चांदे बुद्रूक, चांदे खुर्द, चिंचोली रमजान, थेरगाव नागमठाण, भोसे, रूईगव्हाण, सुपे, तिखी, नागलवाडी, रातंजण, घुमरी, रेहकुरी.