शेवगाव तालुक्यात एकूण ९५ ग्रामपंचायती असून, ४८ ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. १५ जानेवारीला या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे लांबणीवर गेलेल्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच गावागावात चर्चांना वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
दरम्यान, ४८ ग्रामपंचायतींमध्ये १०४ प्रभाग असणार आहेत. ४८ गावांतील ७६ हजार १६१ मतदार आहेत. त्यामध्ये ३९ हजार ६४६ पुरुष, तर ३६ हजार ५१५ महिला मतदार मतदानाचा हक्क बाजावताना ४०८ सदस्य निवडून देणार आहेत.
...
...या ग्रामपंचायतींची होणार निवडणूक
ठाकूर पिंपळगाव, बक्तरपूर, निंबेनांदूर, मजलेशहर, शेकटे बुद्रुक, लखमापुरी, सुकळी, कोळगाव, हसनापूर, सोनविहीर, शिंगोरी, कोनोशी, अधोडी, खुंटेफळ, बोडखे, दादेगाव, ताजनापूर, गायकवाड जळगाव, कांबी, वाडगाव, नागलवाडी, सुलतानपूर बुद्रुक, भावीनिमगाव, भातकुडगाव, नवीन दहीफळ, जुने दहीफळ, राणेगाव, अंतरवाली बुद्रुक, अंतरवाली खुर्द, चेडेचांदगाव, ढोरजळगाव-ने, आखतवाडे, तळणी, दहीगाव-शे, गदेवाडी, हातगाव, ढोरजळगाव-शे, आव्हाणे खुर्द, बेलगाव, चापडगाव, घोटण, मळेगाव-शे, नजीक बाभूळगाव, पिंगेवाडी, राक्षी, सोनेसांगावी, ठाकूर, निमगाव, वरखेड.