शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगले काम केले आहे. सध्या सगळीकडे बिनविरोध निवडणुकीचे वारे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगले काम केले आहे. सध्या सगळीकडे बिनविरोध निवडणुकीचे वारे सुरू आहे. तेव्हा शिक्षक बँकेची निवडणूक सुद्धा बिनविरोध झाली तर शिक्षकांचे पगार लवकर करण्यात येतील, सुट्या जादा देण्यात येतील, नियमित पगारासाठी प्रशासन सहकार्य करील. तेव्हा सर्व शिक्षक संघटनांनी याचा विचार करावा, असे मिश्किल आवाहन राज्याचे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी केले.

प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांची शिक्षण उपसंचालक म्हणून बढती व बदली झाल्याबद्दल त्यांचा तसेच प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे, उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण, नगर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे आदींचा जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने शिक्षक बँकेच्या सभागृहांमध्ये सत्कार करण्यात आला.

काठमोरे म्हणाले, अनेक उपक्रम शिक्षकांच्या सहकार्याने राबविण्यात आले, याचे समाधान मला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा गेल्या तीन वर्षांत दहा टक्के निकाल वाढला. २६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला, असेही ते म्हणाले.

संजय कळमकर, राजू साळवे यांनी विनोदी शैलीमध्ये मतप्रदर्शन केले. सलीमखान पठाण यांच्या शेरोशायरीने कार्यक्रमात रंग भरला. यावेळी आबा लोंढे, राजू राहणे, संजय धामणे, राजू शिंदे, राजेंद्र निमसे, कल्याण लवांडे, दादा वाघ, साहेबराव अनाप, बापूसाहेब तांबे, के. आर. ढवळे, संजय पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब चाबुकस्वार यांच्या पुढाकाराने सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एक चांगला कार्यक्रम पार पाडल्याबद्दल बापूसाहेब तांबे यांनी सर्वांना धन्यवाद दिले. सूत्रसंचालन मंगेश खिलारी यांनी केले. आभार नितीन पंडित यांनी मानले.

............

केंद्रप्रमुख भरतीत ५०-५० प्रस्ताव

केंद्रप्रमुख भरतीबाबत ५० टक्के सरळ सेवा व ५० टक्के पदोन्नतीचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. शाळा स्तरावर वेगवेगळ्या समित्या कमी करून फक्त शाळा व्यवस्थापन समिती व परिवहन समिती ठेवावी, अशी शिफारस केली आहे, असे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.

...........

२६ शिक्षक बँक