शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साडेचारशे जणांना निवडणूक बंदी : वेळेत खर्च सादर न केल्याने फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 17:23 IST

गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक खर्च वेळेत सादर न केलेल्या उमेदवारांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच दिला.

अहमदनगर : गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक खर्च वेळेत सादर न केलेल्या उमेदवारांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच दिला. त्यामुळे ४५१ उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक बंदी असणार आहे.गेल्या नोव्हेंबर ते डिसेंबर २०१७ या कालावधीत मुदत संपणाºया २०७ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका ५ आॅक्टोबर २०१७ रोजी झाल्या. ९ आॅक्टोबरला निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. निवडणूक लढविणाºया सर्वच उमेदवारांना निकालानंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार ९ नोव्हेंबर २०१७पर्यंत निवडणुकीतील उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करणे अपेक्षित आहे. मात्र निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ४८४ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना नोटिसा पाठवून म्हणणे मागवण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासमोर जुलै २०१८मध्ये यावर दोन दिवस सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत ३३ जणांनी निवडणूक खर्चाचा समाधानकारक खुलासा केल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली. मात्र उर्वरित ४५१ उमेदवारांनी समाधानकारक खुलासा न केल्याने अखेर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी त्यांना पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर अनेक दिग्गजांची अडचण झाली आहे.दरम्यान, या उमेदवारांना जिल्हाधिका-यांच्या या अपात्र आदेशाविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची संधी असल्याने तेथे त्यांना दिलासा मिळण्याचीही शक्यता आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर