शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृध्द महिला ठार

By admin | Updated: August 9, 2014 23:33 IST

श्रीगोंदा : लिंपणगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात रुख्मिणी सावळेराम हांडे (वय ६५) ही वयोवृद्ध महिला ठार झाली

श्रीगोंदा : लिंपणगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात रुख्मिणी सावळेराम हांडे (वय ६५) ही वयोवृद्ध महिला ठार झाली आहे. दरोडेखोरांनी नाना रेवगे यांची मोटारसायकल पळवून नेली तर किसन हांडे यांच्या घरातील कपडे चोरण्याचा प्रयत्न केला ही घटना शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली.समजलेली अधिक माहिती अशी की, अज्ञात दरोडेखोरांनी सुरुवातीला नाना रेवगे यांची टमटम गाडी चोरण्याचा प्रयत्न केला, परंतु चावी हाती लागली नाही. त्यानंतर मोटारसायकल चोरली आणि किसन हांडे यांच्या घरातील कपडे चोरले. तेवढ्यात शेजारी राहणाऱ्या रुख्मिणी हांडे घराबाहेर आल्या असत्या त्यांचा व दरोडेखोरांचा समोरासमोर सामना झाला. मागचा पुढचा विचार न करता दरोडेखोरांनी रुख्मिणी हांडे यांच्या डोक्यात टणक वस्तूने घाव घातला. रुख्मिणी हांडे रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. दौंड येथील रुग्णालयात नेण्यापूर्वीच रुक्मिणी हांडे यांनी प्राण सोडले. याबाबतची फिर्याद संतोष हांडे यांनी दिली.घटनास्थळास शनिवारी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अप्पर पोलीस अधीक्षक शैलेंद्र बलकवडे, पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक शशिकांत पाटोळे, पोलीस निरीक्षक अशोकराव ढेकणे यांनी भेट दिली आणि तपासाची चक्रे फिरविली आहेत. श्वान पथकाने ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत दरोडेखोरांचा मार्ग दाखविला. घटनास्थळाजवळ एक स्क्रू ड्रायव्हर , गजाचा तुकडा सापडला. दरोडेखोर मोटारसायकलवरून पसार झाले. (तालुका प्रतिनिधी)