शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाईनमधील वृध्द महिलेचा उपचारासाठी जाताना मृत्यू, राशीनमध्ये घबराट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:16 IST

राशीन (जि. अहमदनगर) मुंबई (वाशी) येथून  राशीनला आपल्या मुलीकडे आलेल्या कोरोना संशयित वृध्द महिलेचा मृत्यु झाला आहे. या ६० वर्षीय महिलेस येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत विलगिकरण करण्यात आले होते. त्यामुळे पुणे, मुंबई सारख्या ठिकाणाहुन आलेल्या लोकांमुळे गावकरी धास्तावले आहेत. 

राशीन (जि. अहमदनगर) मुंबई (वाशी) येथून  राशीनला आपल्या मुलीकडे आलेल्या कोरोना संशयित वृध्द महिलेचा मृत्यु झाला आहे. या ६० वर्षीय महिलेस येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत विलगिकरण करण्यात आले होते. त्यामुळे पुणे, मुंबई सारख्या ठिकाणाहुन आलेल्या लोकांमुळे गावकरी धास्तावले आहेत. बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या महिलेस नगर येथे हे पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेले जात होते. मात्र या महिलेला रस्त्यातच मृत्यूने गाठले. संबंधित महिला १३ मे रोजी मुंबई वाशी येथून राशीनला आपल्या मुलीकडे आली होती. त्यांना दम्याचा घशाचा त्रास होत असल्यान १६ मे रोजी संबंधित महिलेची नगरला वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. औषधोपचार देऊन त्या महिलेला राशीन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. बुधवारी (दि.२०) रात्री या महिलेस दम लागत होता. घसा दुखत होता आणि तापही आला होता. उपचारासाठी त्या महिलेस नगर येथील जिल्हा रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेणे नेले जात होते. मात्र रस्त्यातच महिलेचा मृत्यू झाला. या महिलेस रक्तदाब मणक्याचा विकारही असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी सांगितले.  विलगीकरण कक्षात असताना ही महिला कोणाकोणाच्या संपर्कात आली होती, यावर प्रशासन आता काम करीत आहेत. 

संबंधित महिलेस करोना सदृश्य आजाराची लक्षणे जाणवत असल्यानेच त्यांची तपासणी करून त्यांना राशींनच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मृत्यूनंतर संबंधित महिलेचा स्वॅप नमुने घेऊन तो तपासणीसाठी पाठवला आहे. त्याचा अहवाल रात्री उशिरा अथवा उद्या सकाळी येईल.                         डॉ. संदीप पुंड, तालुका वैद्यकीय अधिकारी कर्जत