शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरातील संदिपनी ॠ षी बालिका आश्रम-मुलींचा सांभाळ करणारे वयोवृद्ध आदर्श माता-पिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 19:56 IST

रक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो; पण ज्यांना रक्ताच्या नात्यातील कोणीच नाही वा नात्यातील कोणी सांभाळ करीत नाही, अशा मुलांचे काय? या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्याचसाठी घालविणारा ‘बाप माणूस’देखील आपल्यामध्येच असतो. अशा बाप माणसाला ‘फादर्स डे’निमित्त ‘लोकमत’चा सलाम!

शेखर पानसरे । 

संगमनेर : सेवानिवृत्त आदर्श शिक्षक सोमनाथ तात्याबा कळसकर व पत्नी नलिनी कळसकर हे वयोवृद्ध दाम्पत्य अनेक वर्षांपासून गरजू, गरीब, निराधार मुलींचा सांभाळ करत आहेत. दाम्पत्याने १४ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या संदिपनी ॠ षी बालिका आश्रमात सध्या २७ मुली वास्तव्यास आहेत. सेवानिवृत्तीनंतर मिळणाºया पेन्शनमधून पालकत्वाची जबाबदारी सक्षमपणे स्वीकारली आहे.   ‘देशाने माझ्यासाठी काय केलं, या पेक्षा मी देशासाठी काय केलं’, हे महत्वाचं आहे. या विचाराने वागणारे कळसकर गुरूजी व त्यांची पत्नी नलिनी. या दोघांचाही पेशा शिक्षकाचा. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. १९७५ साली गुरूजींची बदली घुलेवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत झाली. कंजारभाट समाजातील मुलांना शैक्षणिक व सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी १९७६ साली शाळेच्या जवळच गोकूळ नावाचे वसतिगृह स्व खर्चातून सुरू केले. मुलांचा अभ्यास, जेवण, राहणे अशी सर्व व्यवस्था येथेच करण्यात आली. कंजारभाट समाजातील मुलांचे जीवन समृद्ध करण्यात कळसकर गुरूजींचा मोलाचा वाटा आहे. ही अनेक मुले आज उच्चपदस्थ अधिकारी म्हणून शासकीय सेवेत आहेत. साखर शाळा, वस्तीशाळा, बालवाडी या सारख्या शैक्षणिक  प्रकल्पांसाठी नेहमीच पुढाकार घेणाºया कळसकर गुरूजींना दिल्ली येथे ५ सप्टेंबर १९८८ ला उपराष्टÑपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्टÑीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

     गोरगरिबांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी १९८९ साली इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत संगमनेरातील इंदिरानगरमध्ये त्यांनी कळसकर विद्यालय सुरू केले. २ जून २००० ला कळसकर गुरूजी सेवानिवृत्त झाले. परिस्थितीमुळे कोणीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी कळसकर दाम्पत्याने त्यांच्या घरीच मुलींची चहा, नाष्टा, जेवण, राहणे अशी सर्व सोय केली. जागा कमी पडू लागल्याने शाळेच्या परिसरात खोल्या बांधत २१ जून २००६ ला संदिपनी ॠ षी बालिका आश्रम सुरू केले. या आश्रमात संगमनेर, अकोले, पारनेर या तालुक्यातील २७ मुली वास्तव्यास आहेत. सर्व खर्च कळसकर दाम्पत्य हे त्यांना मिळणाºया पेन्शनमधून करते. अनेक मुली नोकरीला लागून स्वत:च्या पायावर गुरूजींनी दिलेल्या आधारामुळे भक्कमपणे उभ्या आहेत.

‘प्रयत्न हाच परमेश्वर आहे’ ‘मानवसेवा हिच ईश्वरसेवा आहे’ आणि त्याच वाटेने आम्ही चाललो आहोत. गरजूंना आधार देण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही. उदार मनाची आवश्यकता आहे. इच्छा असली, की मार्ग सापडतो. माणसाचा प्रामाणिक, चांगला हेतू असला की, यश त्याच्यामागे जाते. माणसाला यशामागे धावण्याची गरज नाही.      - सोमनाथ कळसकर /     नलिनी कळसकर