शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीपुत्राच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रशासन घेईना दखल

By चंद्रकांत शेळके | Updated: October 18, 2023 21:01 IST

आठ दिवसांपासून उपोषण सुरू

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दिवसा किमान १० तास मोफत अखंडीत वीज पुरवठा करण्यात यावा, नोकऱ्यांचे खासगीकरण व सरकारी शाळांचे व्यापारीकरण हे निर्णय मागे घेण्यात यावेत, नोकरभरतीसाठी विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारे १ हजार रुपये परीक्षा शुल्क रद्द करण्यात यावे आदी मागण्यांसाठी पाथर्डी तालुक्यातील शेतकरीपूत्र बाळासाहेब कोळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आठ दिवसांपासून हे उपोषण सुरू असून अद्याप प्रशासन किंवा शासनाने त्यांची दखल घेतलेली नाही.

कोळसे पाटील (आडगाव, ता. पाथर्डी) यांनी निवेदनात म्हटले आहे की, आपण शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र व दिल्लीपर्यंत सायकल प्रवास केला आहे. परंतु मागण्यांची कोणीही दखल घेतली नसल्याने १२ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आठवा दिवस असून जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवर होणारे प्रयत्न निरुपयोगी ठरताना दिसत आहेत.

कर्जबाजारीपणा तसेच नापिकी, आर्थिक परिस्थिती अशा वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांना मोफत पाणी व मोफत वीज पुरवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे किमान १० तास दिवसा मोफत अखंडीत वीज पुरवठा करण्यात यावा.

नोकऱ्यांचे खासकीकरण व कंत्राटीकरण, तसेच सरकारी शाळांचे व्यापारीकरण हा अन्याकारक निर्णय असल्याने सरकारने तो मागे घेतला पाहिजे. राज्यात तबल १० वर्षांनंतर तलाठी, जिल्हा परिषद, वन विभाग, जलसंपदा, आरोग्य विभाग अशा विविध विभागात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. परंतु यासाठी घेतले जाणारे १ हजार रुपये परीक्षा शुल्क अवाजवी असून ते रद्द करावे, या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर