शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

पाथर्डीतील धुमश्चक्रीत आठ गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 10:00 IST

पाथर्डी  : शहरातील अजंठा चौकात मंगळवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दोन गटात तलवारीने आपसातील तुंबळ हाणामारीत शिरसाठवाडी व भिकनवाडा अश्या दोन्ही गटातील ८ जन गंभीर जखमी झाले असून परस्पर विरोधी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले बाबत विविध कलमान्व

 पाथर्डी  : शहरातील अजंठा चौकात मंगळवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दोन गटात तलवारीने आपसातील तुंबळ हाणामारीत शिरसाठवाडी व भिकनवाडा अश्या दोन्ही गटातील ८ जन गंभीर जखमी झाले असून परस्पर विरोधी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले बाबत विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. सदरील घटने बाबत पहिल्या फिर्यादीत फिर्यादी गणेश बाळासाहेब शिरसाठ याने त्यांना व यांच्या सोबत असलेले महादेव बाळासाहेब शिरसाट,नितीन नवनाथ शिरसाट,नवनाथ यशवंत शिरसाठ रा.शिरसाठवाडी हे अजंठा चौकात दुध विक्री करत असताना भिकनवाडा येथील आरोपी १) मुन्ना निजाम पठाण याच्या गाडीचा धक्का लागून दुध सांडल्याचा जाब विचारल्याचा राग येवून आरोपी २)फारुख रफीक शेख ३)लाला रफीक शेख, ४)निजाम रफीक शेख ५)जुबेर फारूख शेख, ६)छोट्या राजू पठाण ७)जुबेर शफीक आतार ८)मुन्ना शेख (मटनवाला) ९)भैय्या शेख १०)काल्या निजाम शेख ११)रंगनाथ गायकवाड १२)सोहेल पठाण १३)बब्बू रिक्षावाला १४)सुरज दहीवाले १५)असिफ शेख व इतर १० ते १२ आरोपींनी फिर्यादी व त्यांचे सहकार्यांना तलवार,चाकू,लोखंडी गज,लाठ्या काठ्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान केले बाबत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. तर दुसऱ्या फिर्यादीत फिर्यादी अमीर उर्फ मुन्ना निजाम शेख हा त्याचे मालकीच्या गाडीचा धक्का लागल्याच्या रागातून याचे डोक्यात लोखंडी गजाने आरोपी १) गोकुळ शिरसाठ २) देवा शिरसाठ ३) प्रवीण शिरसाठ ४) गणेश शिरसाठ ५) नितीन शिरसाठ ६) संजय शिरसाठ यांच्यासह १० ते १२ जणांनी फिर्यादी व त्यांचे सहकारी तौफिक शेख,रंगनाथ गायकवाड,जुबेर शेख यांना तलवार,लोखंडी गज,लाठ्या काठ्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले बाबत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.यावेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत वीस ते पंचवीस दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून दगडफेकीमुळे रस्त्यावर दगडांचा खच पडला होता तसेच अचानक झालेल्या धुमचक्रीने नागरिकांची पळपळ झाली. घटना ठिकाणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी भेटी दिल्या. फोटो – दोन गटातील हाणामारीत झालेल्या दगडफेकीत वीस ते पंचवीस दुचाकीचे मोठे नुकसान झाले,दगडफेकीमुळे रस्त्यावर दगडांचा खच पडला होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी