शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हद्दपार असणा-यांचा नगर शहरात वावर : नगरसेवकासह आठ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 16:39 IST

गणेशोत्सव व मोहरम काळात हद्दीपारीची कारवाई झालेली असतानाही नगर शहरात वावरणा-या नगरसेवकासह आठ जणांना शनिवारी पोलीसांनी अटक केली़.

अहमदनगर: गणेशोत्सव व मोहरम काळात हद्दीपारीची कारवाई झालेली असतानाही नगर शहरात वावरणा-या नगरसेवकासह आठ जणांना शनिवारी पोलीसांनी अटक केली़.पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ३०० जणांवर पोलीसांच्या शिफारशीनुसार उपविभागीय दंडाधिकारी यांनी १२ ते २५ सप्टेंबरपर्यंत हद्दपारीची कारवाई केलेली आहे. ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांना या काळात नगर शहरात राहता येणार नाही. कारवाई झाल्यानंतरही अनेक जण नगर शहरातच वावरत असल्याचे निदर्शनास अल्यानंतर पोलीसांनी कारवाई केली. यामध्ये नगरसेवक अरिफ रफीउद्दीन शेख यांच्यासह गणेश प्रकाश वाळके, नंदू लक्ष्मण बोराटे, परेश उर्फ परशूराम चंद्रकांत खराडे, शेख समीर ख्वाजा, युवराज नाना सपकाळ, सनी शंकर निकाळजे यांना अटक करून त्यांंच्यावर कलम १८८ प्रमाणे कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारवाई होताच अनेक जण गायबप्रतिबंधक कारवाईनंतरही शहरात वावरणा-यांची पोलीसांनी शुक्रवारी धरपकड सुरू केल्याने कारवाई झालेले अनेक जण शहराबाहेर निघून गेले आहेत. हद्दपारीचे आदेश दिलेल्या ३०० पैकी बहुतांशी जण शहरात राहून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत होते. शहरबंदीची कारवाई झालेले शहरात आढळून आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मिटके यांनी दिला आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस