शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतर प्रथमच घरात अदा झाली ईदची नमाज; इतर खर्च टाळून मुस्लिम बांधवांकडून सामाजिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 15:43 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्वातंत्र्यानंतर यंदा प्रथमच मुस्लिम बांधवांनी सार्वजनिक नव्हे तर घरातच ईद-उल फित्र साध्या पद्धतीने साजरी केली. सोमवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत घरोघरी नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर कुटुंबीयांनी एकमेकांना तसेच फोनवरून व सोशल मीडियाच्या माध्यमातून नातेवाईक, मित्रांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

अहमदनगर: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्वातंत्र्यानंतर यंदा प्रथमच मुस्लिम बांधवांनी सार्वजनिक नव्हे तर घरातच ईद-उल फित्र साध्या पद्धतीने साजरी केली. सोमवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत घरोघरी नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर कुटुंबीयांनी एकमेकांना तसेच फोनवरून व सोशल मीडियाच्या माध्यमातून नातेवाईक, मित्रांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षी ईदनिमित्त नगर शहरातील ईदगाह मैदानात तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी मशिदीत सामूहिक नमाज पठण करून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदा मात्र कोरोनामुळे सर्व मुस्लिम बांधवांनी घरातच ईद साजरी करण्याचे आवाहन प्रशासनासह सामाजिक संस्था व धार्मिक स्थळांच्यावतीने करण्यात आले होते. त्यामुळे यंदा ईदची रोनक आणि धामधूम कुठेच दिसली नाही. दरवर्षी विविध ठिकाणी होणारे होणारे ईद मिलनचे सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले. लॉकडाऊनमुळे गेली महिनाभर मुस्लिम बांधवांनी घरात राहूनच रोजे ठेवले. ईदनिमित्त दरवर्षी बाजारपेठेत खाद्य पदार्थांसह विविध वस्तू खरेदीसाठी मोठी गजबज असायची़ यातून बाजारपेठेत मोठी उलाढाल होत होती. यावर्षी मात्र लॉकडॉऊनमुळे सर्वत्र दुकाने बंद होती. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले, हजारो जणांचा रोजगार गेला़ अशा संकटामुळे यंदा अनावश्यक खर्चांना फाटा देत मुस्लिम बांधवांनी अगदी साध्या पद्धतीने ईद साजरी केली. ईदनिमित्त सामाजिक उपक्रम यंदा दरवर्षीसारखी रमजान ईद साजरी करता आली नसली तरी जिल्ह्यात विविध ठिकाणी मुस्लिम बांधव व सामाजिक संस्थांच्यावतीने ईदनिमित्त गेल्या महिनाभरात सामाजिक योगदान दिलेग़रजूंना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEid e miladईद ए मिलाद