शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

गमावलेल्या दातांचे परिणाम व उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:21 IST

परिणाम - दात काढले व ते परत बसवले नाहीत तर इतर दातांवर चावण्याचा अतिरिक्त भार पडल्यामुळे इतर दातांचे आरोग्य ...

परिणाम - दात काढले व ते परत बसवले नाहीत तर इतर दातांवर चावण्याचा अतिरिक्त भार पडल्यामुळे इतर दातांचे आरोग्य धोक्यात येते. विशेषत: चावण्यासाठीच्या दाढी काढल्याने हा परिणाम होतो. दात गमावल्यामुळे एकाच बाजूने अन्नाचे चर्वण झाल्यास त्या बाजूवर वाईट परिणाम होऊन जबडा व सांध्यास दुखापत होण्याची शक्यता असते.

याव्यतिरिक्त दात नसल्यामुळे हवे तेवढे अन्नाचे चर्वण न झाल्याने पचन संस्थेवर विपरित परिणाम होऊन पित्त होणे किंवा अपचन होणे इत्यादी आजार संभवतात.

दात काढून बरेच दिवस त्या जागेवर दात न बसविल्यास दातांची हालचाल चालू होते आणि दात मोकळ्या जागेत सरकू लागतात. या दातांच्या हालचालींमुळे दोन दातांमध्ये गॅप तयार होतो आणि त्या गॅपमध्ये अन्न अडकणे चालू होते. तसेच दातांची हालचाल झाल्या कारणाने भविष्यात या जागेवर दात बसविणे कठीण ठरते. मधुमेह किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तिंमध्ये दात नसल्यास चर्वण व्यवस्थित न झाल्यास नैसर्गिक अन्नघटक, व्हिटॅमिन, प्रोटीन इ. घटक शरीरास भेटत नाहीत. कारण फळे, पालेभाज्या इ. पदार्थांचे चर्वण व्यवस्थित होत नाही.

वरील सर्व दुष्परिणाम मनुष्याच्या सर्वांगिण आरोग्यासाठी घातक असतात. त्यामुळेच दात काढल्यानंतर किंवा पडल्यानंतर लगेचच १५ दिवसांच्या किंवा एक महिन्याच्या कालावधीत कृत्रिम दात बसवून घेणे फायदेशीर ठरते आणि आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

उपचार - गमावलेल्या दातांवरील उपचार / पर्याय

१) पक्के कृत्रिम दात / ब्रिज उपचार पद्धती - या प्रक्रियेमध्ये गमावलेल्या, काढलेल्या दातांच्या मागील आणि पुढील दातांचा आधार घेऊन या दातांवर कॅप बसवून मधला दात बसविला जातो. यास ब्रिज उपचार पद्धती म्हणजे यामध्ये मेटल, सिरॅमिक, फुल सिरॅमिक इ. प्रकार असतात. दात काढल्यानंतर २१ ते ३० दिवसात ब्रिज पद्धतीने दात फिक्स करता येतात.

२) अंशत: / पूर्णत: कवळी पद्धत - यामध्ये बाजुच्या दातांवर कॅप न टाकता, काढता घालता येणारे असे कृत्रिम दात बसवितात. त्यास कवळी म्हणतात. ही अंशत: / पूर्ण: कवळी दिवसा खाण्यासाठी वापरतात आणि रात्री झोपताना काढून ठेवावी लागते.

३) इंप्लांट उपचार / कृत्रिम दंतरोपण - यामध्ये गमावलेला दात फिक्स करण्यासाठी बाजूच्या दातांचा आधार न घेता जबड्याच्या हाडामध्ये टायटॅनियम धातुचा स्क्रू फिक्स करून या स्क्रूवर कृत्रिम दात बसविला जातो. अनेकदा या इंप्लांट पद्धतीने अंशत: पूर्णत: कवळीसुद्धा फिक्स करता येते.

४) इतर उपचार - याव्यतिरिक्त कॅटिलिवर उपचार पद्धती म्हणजे एकाच बाजुच्या दातांचा आधार घेऊन दात फिक्स करता येतात.

मेरिलड ब्रिज, विनियर क्रॉऊन इंप्लांट सपोर्टेड ब्रिज इ. आधुनिक उपचार पद्धतींचा वापर करूनदेखील आपण कृत्रिम दात फिक्स करू शकतो.

एकंदरीत उपलब्ध अत्याधुनिक उपचार पद्धतींचा अवलंब करून गमावलेले किंवा काढलेले दात फिक्स करून आपण दंतआरोग्य आणि पर्यायाने सर्वांगिण आरोग्य उत्तम राखू शकतो.

डॉ. गोरे सुदर्शन, गोरे डेन्टल क्लिनिक, डॉ. आंबेडकर रोड, माळीवाडा. संपर्क ९०२८३०६०२०